झरपडा येथे कौशल्य आधारीत शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:00+5:302021-03-20T04:27:00+5:30

शेतकरी प्रशिक्षणात कृषी मंडळ अधिकारी सुधीर वरखडे यांनी ५ टक्के निंबोळीअर्क व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. तंत्रज्ञान ...

Skill based farmer training at Jharpada | झरपडा येथे कौशल्य आधारीत शेतकरी प्रशिक्षण

झरपडा येथे कौशल्य आधारीत शेतकरी प्रशिक्षण

Next

शेतकरी प्रशिक्षणात कृषी मंडळ अधिकारी सुधीर वरखडे यांनी ५ टक्के निंबोळीअर्क व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी पर्यावरणपूरक शेतीविषयक माहिती दिली. जैविक व सेंद्रीय खतांचा वापर, जैविक व सेंद्रीय किटकनाशकाचा वापर, जैविक बुरशीनाशक, जीवाणूनाशक व विषाणू नाशकाचा वापर, हिरवळी खताच्या वापराबाबत माहिती विशद केली. उमेदचे समन्वयक कोवित रंगारी यांनी दशपर्णीअर्क, जीवामृत तयार करण्याची पद्धत समजावून सांगितले. नोजेंद्र लांडगे यांनी कामगंध सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून त्याचे फायदे व महत्त्व पटवून दिले. भूमेश्वरी येरणे यांनी पिकातील मित्र व शत्रू कीड कोणते ते कसे ओळखायचे, याबाबत माहिती सांगीतली. सदर शेतकरी प्रशिक्षणात कृषी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गावातील शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महेश मात्रे, दिनेश भेंडारकर, प्रमोद मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: Skill based farmer training at Jharpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.