माहुरकुडा येेथे कौशल्य आधारीत शेतकरी प्रशिक्षण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:26 AM2021-03-24T04:26:58+5:302021-03-24T04:26:58+5:30
शेतकरी प्रशिक्षणात कृषी मंडळ अधिकारी सुधीर वरखडे यांनी ५ टक्के निंबोळी अर्क व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली. ...
शेतकरी प्रशिक्षणात कृषी मंडळ अधिकारी सुधीर वरखडे यांनी ५ टक्के निंबोळी अर्क व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली. तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी पर्यावरणपूरक शेतीविषयी माहिती दिली. जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, जैविक, सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर, जैविक बुरशीनाशक, जिवाणूनाशक व जिवाणूनाशकाचा वापर, हिरवळी खताच्या वापराबाबत त्यांनी माहिती विशद केली. उमेदचे समन्वयक कोवित रंगारी यांनी दशपर्णी अर्क व जिवामृत तयार करण्याची पद्धत समजावून सांगितले. नोजेंद्र लांडगे यांनी कामगंध सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून त्याचे फायदे व महत्त्व पटवून दिले. भुमेश्वरी येरणे यांनी पिकातील मित्र व शत्रू कीड कोणते, ते कसे ओळखायचे, याबाबतची माहिती दिली. सदर शेतकरी प्रशिक्षणात कृषी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महेश मात्रे, दिनेश भेंडारकर, प्रमोद मेश्राम यांनी परिश्रम घेतले.