क्रिमीलीअरच्या अटीतून कुणबी जात वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:46 AM2017-10-27T00:46:34+5:302017-10-27T00:46:46+5:30
कुणबी समाजाला क्रिमीलीअरच्या अटीतून वगळण्यात यावे. अशी मागणी कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : कुणबी समाजाला क्रिमीलीअरच्या अटीतून वगळण्यात यावे. अशी मागणी कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संस्थेतर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात, कुणबी ही जात १९६७ ला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली. महाराष्टÑ क्र.संकिर्ण २००८/यादी/प्र.क्र.५५३/मावक-५, सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग, मंत्रालय विस्तार भवन मुंबई, २६ सप्टेंबर २००८ च्या परिपत्रकानुसार इतर मागास प्रवर्ग यादीत ८३ क्रमांकानुसार इतर मागास प्रवर्ग यादीत ८३ क्रमांकावर आहे. सन २०१४-१६ या काळात शेतकºयांच्या ३ हजार ८८१ आत्महत्या झाल्या. त्यातील ३० टक्के या विदर्भातील कुणबी शेतकºयांच्या आहेत. मराठवाड्यातील हे प्रमाण १६ टक्के आहे. हा अहवाल गोखले इन्स्टिट्युटने हेरुन तो सामाजिक न्याय विभागाला सादर केला. यावरुन कुणबी समाजाचा आर्थिक मागसलेपणा सिद्ध होते.
कुणबी समाज हा अल्पभूधारक, शेतकरी व शेतमजूर आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न अत्यंत कमी आहे, अशी विदारक परिस्थिती असूनही कुणबी जातीला क्रिमीलेअरची अट ही अन्यायकारक आहे. कुणबी समाज महाराष्टÑ पूर्वीपासून शेतीशी जुडलेला आहे. हा समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे. यामुळे मागासवर्ग प्रवर्गातील कुणबी जात समूहास इतर सर्व जाती समूहाला क्रिमिलेअर अट शिथील करण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
यासाठी कुणबी जातीला क्रिमिलिअरच्या जाचक अटीतून वगळण्यात यावे. या आशयाचे निवेदन तहसीलदार डी.सी.बोंबार्डे यांच्यामार्फत तालुकास्तरीय कुणबी समाज बहुउद्देशिय सेवा संस्थेद्वारा मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी संघटनाध्यक्ष अनिरुद्ध ढोरे, गिरीष बागडे, दिवाकर शहारे, प्रमोद पाऊलझगडे, हिरालाल घोरमोडे, पतीराम मुनेश्वर गणेश फुंडे, दिलीप फुंडे, सुनिता हुमे, येमू ब्राम्हणकर उपस्थित होते.