आकाश दिवे, सिरीजला ग्राहकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:08 PM2017-10-16T23:08:48+5:302017-10-16T23:09:15+5:30

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. घराच्या रंगरगोटीसह आकाश दिवे, सिरीज लावून घराची सजावट केली जाते.

Sky lights, the demand for the customer to the series | आकाश दिवे, सिरीजला ग्राहकांची मागणी

आकाश दिवे, सिरीजला ग्राहकांची मागणी

Next
ठळक मुद्देदिवाळीनिमित्त बाजारपेठेत गर्दी : चायना सिरीजच्या विक्रीत घट

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. घराच्या रंगरगोटीसह आकाश दिवे, सिरीज लावून घराची सजावट केली जाते. त्यामुळे सध्या बाजारपेठेत आकाश दिवे आणि सिरीजला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आकाश दिवे आणि सिरिज विक्रेत्यांच्या दुकांनामध्ये ग्राहकांची चांगली गर्दी पाहयला मिळत आहे.
यंदा चायना वस्तूवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला नागरिक देखील काही प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे. दिवाळी दरम्यान दरवर्षी बाजारपेठेत चायना सिरीज, आकाशे दिवे, फटाखे यांची धूम असते. शिवाय या वस्तूंचे दर देखील कमी असल्याने त्यांची मागणी अधिक असते. भारतात सिरीज (लाईटींग) बनविण्याचे काम बंद असल्याचे बोलल्या जाते.
त्यामुळे पर्याय नसल्याने ग्राहक काही प्रमाणात चायना सिरीजचीच खरेदी करावी लागत आहे. चायना आयट्म्सला कितीही विरोध असला तरी सिरीजच्या बाबतीत मात्र नागरिकांना मनमारावे लागत आहे. त्यामुळे देशातच सिरीज तयार करण्याची ग्राहकांची मागणीही होत आहे. तोवर दिवाळीत घरांवर चायना सिरीजच चकाकणार हे सुद्धा तेवढेच सत्य आहे.
प्रकाशाच्या सणात प्रत्येकांनाच आपले प्रकाशमान करावयाचे आहे. यासाठी उत्तम माध्यम हे सिरीज (लाईटींग) आहे. रंगबिरंगी सिरीज घरावर लावल्यानंतर रात्रीला त्यांचा प्रकाश सर्वांचे लक्ष वेधून घेतो. बाजारात वेगवेगळ््या प्रकारच्या सिरीज उपलब्ध आहेत. मात्र या सर्व सिरीज चायना मेड आहे. एकीकडे चायना मेड वस्तूवर बहिष्कार टाकला जात आहे. कित्येकांनी त्याच धर्तीवर चायना वस्तू खरेदी न करण्याचा संकल्पही घेतला आहे. मात्र दिवाळी या सणात आपल्या घराच्या सजावटीसाठी बहुतांश नागरिक सिरीज खरेदी करत असल्याचेही दिसून येत आहे. शिवाय विक्रेते सुद्धा मर्जी नसतानाही फक्त व्यापार म्हणून चायना सिरीजची विक्री करीत आहेत. पर्याय नसल्याने नागरिक ही चायना सिरीजची खरेदी करीत आहे.
राष्ट्रीय पातळीवर बंदी हवी
देशवासीयांकडून चायना वस्तू खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला जात आहे. मात्र सणामुळे व चायना सिरीजला पर्याय नसल्यामुळे कित्येकांकडून मनमारून चायना सिरीज खरेदी केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच नियोजन करून देशात चायना वस्तू बंदी घालण्याची गरज असल्याचेही काहींनी बोलून दाखविले.
३० रूपयांपासून सिरीज उपलब्ध
बाजारात सध्या ३० रूपयांपासून १५० रूपयांपर्यंत चायना सिरीज उपलब्ध आहेत. विविध रंग व प्रकारांची ही सिरीज असल्याने नागरिकांकडून दिवाळीच्या सजावटीनिमित्त या सिरीजची खरेदी केली जात आहे. त्यामुळे सध्या इलेक्ट्रनिक साहीत्यांच्या दुकानात नागरिकांची सिरीज खरेदीसाठी जास्त गर्दी दिसू लागली आहे. सिरीजचा हा व्यवसाय दिवाळीतच राहतो त्यामुळे व्यापारीही मोठ्या प्रमाणात सिरीज मागवून ठेवतात.

Web Title: Sky lights, the demand for the customer to the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.