रस्ता दुरूस्तीच्या नावावर झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:36 AM2018-01-20T00:36:13+5:302018-01-20T00:36:22+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील मुरदोली ते गोंगले या रस्त्याच्या दुरूस्तीचे व रस्तालगत असलेले गवत काढण्याचे काम सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व रोजगार हमी योजनेतंर्गत केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील मुरदोली ते गोंगले या रस्त्याच्या दुरूस्तीचे व रस्तालगत असलेले गवत काढण्याचे काम सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व रोजगार हमी योजनेतंर्गत केले जात आहे. मात्र या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुरदोली ते गोंगले या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला दीड ते दोन किमी. अंतरापर्यंत कंत्राटदाराच्या माध्यमातून गवत काढणे, लहान झाडे लावणे, दगडाला चुना लावणे, खड्डे बुजविणे इत्यादी कामे केली जात आहे. मात्र कंत्राटदाराकडून ट्रॅक्टरच्या माध्यमाने राफडी लावून गाडीपार ते गोंगले दरम्यान रस्त्याच्या बाजुला लावलेल्या करंजीच्या झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे या प्रकारावर गावकरी व पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या ‘झाडे लावा-झाडे जगवा’ या उद्देशावर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी कोसमतोंडी ते गोंगले १० किमी. अंतराच्या रस्त्यावरील गवताची मजूर लावून कंत्राटदारांने कापणी केली.
त्यामुळे हा रस्ता चांगला झाला मात्र मुरदोली ते गोंगले रस्त्याच्या बाजुचे गवत ट्रॅक्टर लावून काढण्यात आले. त्यामुळे हा रस्ता अद्यापही पूर्णपणे स्वच्छ झाला नाही.
त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे.