कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे वाहन पकडले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:31 AM2021-03-23T04:31:13+5:302021-03-23T04:31:13+5:30
गोरेगाव : गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव येथून जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला बजरंग दल शाखा आंबेतलावच्या सदस्यांनी पकडून दिले. आंबेतलाव ते ...
गोरेगाव : गोरेगाव तालुक्यातील आंबेतलाव येथून जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला बजरंग दल शाखा आंबेतलावच्या सदस्यांनी पकडून दिले. आंबेतलाव ते गोरेगाव मार्गाने जनावरांची बोलेरो पीकअप गाडी जनावरांना डांबून नेत असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना २१ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मिळाली असता त्यांनी जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवली होती. त्यानंतर पहाटे ३ वाजताच्या सुमारास ४ बोलेरो पीकअप वाहन बजरंग दलाच्या सदस्यांनी पकडले. ते चारही वाहन गोरेगाव पोलिसांना सोपविले.
बोलेरो पिकअप वाहन एमएच ३५ एजे ०६४३, एमएच ३५ एजे ०९४०, एमएच ३५ एजे १४९१, एमएच ३५ एजे २०५६ या चार वाहनातून १० म्हशी व १० बैल असे २० जनावरे जप्त करण्यात आलेत. यासंदर्भात बजरंग दल तालुका संयोजक राजेश बिसेन यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरूद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११,१ ड, सहकलम ५,६,९, प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विश्व हिंदू परिषद तालुकामंत्री सुनील कोहडे, बजरंग दल तालुका संयोजक राजेश बिसेन, विश्व हिंदू परिषद तालुका प्रमुख भुमेश पारधी, तालुका सहसंयोजक दिलीप बावनकर, तालुका सहसंयोजक उमेश बोपचे, सुभाष पटले, मुन्ना बोपचे, कमलेश गजबे, कोमल वघरे, राहुल येळे, विजय रणदिवे, निलेश राऊत, प्रदीप बिसेन, दीपक पारधी, राकेश बघेले,खुशाल कटरे उपस्थित होते. तपास सहाय्यक फौजदार अरूण इलमे करीत आहेत.