दिव्यांगांची प्रशासन विरोधी नारेबाजी
By admin | Published: February 11, 2017 01:15 AM2017-02-11T01:15:06+5:302017-02-11T01:15:06+5:30
दिव्यांगाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान जिल्हाधिकारी
२०० दिव्यांगांचा आक्रोश : सभा न घेतल्याचा काढला राग
गोंदिया : दिव्यांगाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु दिव्यांगांना बैठक रद्द केल्याची कोणतीही सूचना देण्यात आली नाही. यामुळे बैठकीला आलेल्या २०० दिव्यांगांना बैठक रद्द झाल्याची माहिती मिळताच संतापलेल्या दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पडून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात नारे लावले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमगाव रस्त्यावर काहीवेळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्नही केला.
आपल्या विविध मागण्यांना घेऊन अपंग कल्याणकारी संघटनेने उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला सोडवितांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अपंगाच्या समस्यांवर तोडगा निघेल या आशेने २०० दिव्यांगांनी बैठकीसाठी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. परंतु त्यांची सभा रद्द झाल्याचे कळताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर येऊन जिल्हाप्रशासनाच्या विरोधात नारे लावले.
विशेष म्हणजे प्रशासनाच्या या भुमिकेमुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांनी आमगाव-गोंदिया रस्त्यावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न ही केला. परंतु वेळीच दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांचा रस्ता रोेको हानून पाडला. पुन्हा सकारात्मक चर्चेकरीता अपंग कल्याण कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.
तीव्र आक्रोश व्यक्त करणाऱ्यांमध्ये जिल्हा अपंग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बंसोड, दिनेश पटले, शामसुंदर बंसोड, आकाश मेश्राम, चंद्रकला डहारे, सागर बोपचे, राजकुमार भेंडारकर, मिलींद फाये, अर्चना दुणेदार, राखी चुटे, जितेंद्र मस्के व इतरांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)