जिल्ह्यात प्रथम आलेल्या स्मिताचा केला सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:44+5:302021-08-27T04:31:44+5:30
शाळेतून ४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सार्थ देशमुख याने ९६ टक्के मिळवून द्वितीय, राशी परतेती हिने ९२.८० टक्के ...
शाळेतून ४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सार्थ देशमुख याने ९६ टक्के मिळवून द्वितीय, राशी परतेती हिने ९२.८० टक्के गुण मिळवून तृतीय, सिया रामटेके हिने ९२.४० टक्के गुण मिळवून चतुर्थ तर ताशू नामदेव हिने ९१ टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, स्मिताने रसायनशास्त्रात पूर्ण १०० तर जीवशास्त्रात १०० पैकी ९९ गुण मिळविले आहेत, तर सार्थ देशमुख याने शारीरिक शिक्षण विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले आहेत. शिवाय गुणवत्ता यादीत अंशुम सहारे (८८), आयुष येडे (८५), प्रशमित पाल (८५), भावना मलगम (८४), दीप सोनछात्रा (८४), दीव सोनछात्रा (८४), रिशा चव्हाण (८३), सिद्धांत थलाल (८१) अंकित जिभकाटे (८०), हर्षप्रीत भाटिया याने (७८) टक्के गुण मिळविले आहे. त्यांचे संस्थाध्यक्ष अर्जुन बुद्धे, प्राचार्य जितेंद्र तलरेजा, उपप्राचार्य रीता अग्रवाल, विषय शिक्षक सुनीता मिश्रा, वाय. वाय. पारधी, हिरामन बिद्धे, वर्षा गुप्ता व अन्य शिक्षकांनी कौतुक केले आहे.