बोंडराणी नाक्यावरून तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:57 PM2017-11-27T22:57:59+5:302017-11-27T23:00:07+5:30

तिरोडा-खैरलांजी या मध्यप्रदेश राज्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्जुनी-बोंडराणी येथे वन विभागाचा नाका आहे.

Smugglers from Bondarani | बोंडराणी नाक्यावरून तस्करी

बोंडराणी नाक्यावरून तस्करी

Next
ठळक मुद्देकर्मचाºयांचे साटेलोटे : नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेºयाची आवश्यकता

आॅनलाईन लोकमत
परसवाडा : तिरोडा-खैरलांजी या मध्यप्रदेश राज्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्जुनी-बोंडराणी येथे वन विभागाचा नाका आहे. मात्र हा नाका फक्त शोभेची वस्तू ठरत असून विविध वस्तूंची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या तस्करांच्या सहकार्यासाठीच असल्याचे दिसून येत आहे.
बोंडराणी येथे वैनगंगा नदीवरील पूल महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा पूल आहे. मध्यप्रदेशात टेमनी मार्ग खैरी, खैरलांजी, बालाघाट, शिवनी, मलाजखंड, मंडला, जबलपूरवरुन व महाराष्ट्रातून गोंदिया, साकोली, नागपूर, आंधप्रदेश या ठिकाणाहून मध्यप्रदेशात तस्करी होते. मध्यप्रदेशातून दररोज महाराष्ट्रत लाकडे आणले जाते. त्या ठिकाणी लाकूड कटाई बंद असल्याने बाजारात विक्री करणे शक्य नाही. त्यामुळे त्याची अवैध तस्करी केली जाते. तसेच विटा, मॅग्नीज, मोहफूल, चोरीच्या शेळ्या, गाई, केमिकल्स व महाराष्ट्रातून रासायनिक खते व इतर वस्तूंचीसुद्धा तस्करी होत आहे. परंतु सर्वच विभागातील अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. सर्वच विभागाचे काही कर्मचारी प्रत्येक आठवड्याला व्हिजिट देऊन जात असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली.
यात वन विभागाचे कर्मचारी दोन तीन टप्प्यात काम करतात. सदर कर्मचाºयांच्या नाका कार्यालयात अवैध काम करणारे व्यापारी येऊन पैशाची बोलणी करित असल्याचा आरोप आहे. वन कर्मचारी गाडी येताच नाका बॅरीकेट्स उघडतो. चालक आपले वाहन सरळ घेवून जातो. दररोज या नाक्यावरुन लाखोंची वाहतूक होते. याची जाणीव फक्त काही विशेष अधिकाºयांना आहे. या नाक्याकडे व रस्त्यावर वरिष्ठ अधिकारी वर्गाचे लक्ष नाही. या मार्गावर वाहतूक कमी असून प्रवासी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात ये-जा करतात, त्यांना हीच जाणीव आहे. पण या मार्गाने अवैध धंदे करणारे व्यापारी अवैध वाहतूक व चोरी मोठ्या प्रमाणात करतात. या मार्गाने चोरी करणारे मोटारसायकलने मध्यप्रदेशात सरळ जातात.
त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची दखल घेऊन नाक्यावर सुरू असलेला गौरखधंदा बंद करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांची आहे.
वसुली करणारे ते कोण
बोंडराणी नाक्याजवळील परिसरात अवैधरित्या मोहफुलांची दारू मोठ्या प्रमाणात काढली जाते. अवैध व्यवसाय करणारेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडून काही विभागाचे कर्मचारी वसुली करीत असल्याची ओरड मागील काही दिवसांपासून आहे. त्यामुळे अवैध वसुली करणारे ते कर्मचारी कोणत्या विभागाचे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. मात्र यासर्व प्रकाराकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Smugglers from Bondarani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.