घोरपडीची शिकार, तिघांना अटक

By Admin | Published: July 5, 2015 02:06 AM2015-07-05T02:06:56+5:302015-07-05T02:06:56+5:30

वनक्षेत्र कार्यालयांतर्गत धाबेटेकडी बिटमधील कक्ष क्र. २६५ राखीव वनामध्ये घोरपडीची शिकार करणाऱ्या तिघांना पकडण्यात आले.

Snake hunting, three arrested | घोरपडीची शिकार, तिघांना अटक

घोरपडीची शिकार, तिघांना अटक

googlenewsNext

अर्जुनी मोरगाव : वनक्षेत्र कार्यालयांतर्गत धाबेटेकडी बिटमधील कक्ष क्र. २६५ राखीव वनामध्ये घोरपडीची शिकार करणाऱ्या तिघांना पकडण्यात आले. तिन्ही आरोपींना अटक करून शनिवारी (दि.४) स्थानिक दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले.
धाबेटेकडी येथील क्षेत्र सहायक संतोष थिपे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर राखीव वनक्षेत्र गस्ती करीत असताना आरोपी खेमराज धनराज वगारे (२०), रुपचंद कुंडलिक लंजे (५०) व विकास गोविंदा लंजे (२९) रा. बोळदे/करड हे पिशवीमध्ये मृतावस्थेत असलेल्या तीीन घोरपड घेऊन जाताना आढळून आले. त्यांना विचारणा केली असता कुत्र्याच्या सहायाने शिकार करुन ते घोरपड खाण्यासाठी घरी घेऊन जात होते. तेव्हा क्षेत्र सहायक संतोष थिपे, वनरक्षक पी.के. ब्राम्हणकर, पी.एम. राऊत, जे.जे. नागपुरे व के.डी. खोब्रागडे यांनी पकडले. तिन्ही आरोपींना अटक करुन त्यांचेवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटलेल्या एका घोरपडीला वनात सोडून जीवदान देण्यात आले.
सहायक वनसंरक्षक मनोहर गोखले, वनक्षेत्राधिकारी रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक संतोष थिपे अधिक तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Snake hunting, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.