जिल्ह्यात आतापर्यंत 26000 बाधितांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 05:00 AM2021-04-30T05:00:00+5:302021-04-30T05:00:19+5:30
जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७४ रुग्णांमध्ये सर्वाधिक २०५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ३६, गोरेगाव ८, आमगाव ६८, सालेकसा ६३, देवरी ४०, सडक अर्जुनी ८८, अर्जुनी मोरगाव ६५ आणि बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीला एक रुग्ण असलेली रुग्णसंख्या वाढत गेली. मात्र, कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २६००० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर, रुग्णसंख्येतसुद्धा सातत्याने घट होत असल्याची बाब समाधानकारक आहे.
जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७४ रुग्णांमध्ये सर्वाधिक २०५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ३६, गोरेगाव ८, आमगाव ६८, सालेकसा ६३, देवरी ४०, सडक अर्जुनी ८८, अर्जुनी मोरगाव ६५ आणि बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १३३३३२ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०७७६३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲण्टिजेन टेस्ट केली जात आहे.
याअंतर्गत १३४९२७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११६४०२ नमुने निगेटिव्ह आले.
जिल्ह्यात आतापर्यंत ३२४८६ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २६००० हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर, सद्य:स्थितीत ५९६३ कोरोना ॲक़्टिव्ह रुग्ण असून ५७७७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.