पोलीस टेक एक्सपोमध्ये सामाजिक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2016 01:12 AM2016-03-01T01:12:10+5:302016-03-01T01:12:10+5:30

गोंदिया पोलीस विभागातर्फे आयोजित पोलीस टेक एक्सपो या प्रदर्शनीत गोंदियातील तरूणांनी सामाजिक जनजागृती करणारे स्टॉल लावले होते.

Social awareness among the police tech expo | पोलीस टेक एक्सपोमध्ये सामाजिक जनजागृती

पोलीस टेक एक्सपोमध्ये सामाजिक जनजागृती

Next

गोंदिया : गोंदिया पोलीस विभागातर्फे आयोजित पोलीस टेक एक्सपो या प्रदर्शनीत गोंदियातील तरूणांनी सामाजिक जनजागृती करणारे स्टॉल लावले होते.
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोसल साईट्सवरून सद्यस्थितीत होत असलेल्या गैरप्रकारावर आळा कसा घालता येईल यावर माहिती देणाऱ्या पत्रकासह तरूणांना माहिती देण्यात आली. नविन तंत्रज्ञानामुळे आजघडीला व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या दुनियेत भिबत्स व अश्लील चलचित्र व चित्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असते. त्यावर कसा आळा घालावा यावर मार्गदर्शन करण्यात आले. अश्या कृत्यामुळे कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात यासंदर्भात माहिती देण्यात आली.
जनजागृती करणाऱ्या तरूणांमध्ये निशीकांत शहारे, आशिष तलमले, गिरीश शहारे, गौरव बोपचे व शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
सदर तरूणांचे कौतुक पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Social awareness among the police tech expo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.