अनाथ मुलीला मदत करुन जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:18 PM2019-04-14T22:18:00+5:302019-04-14T22:18:12+5:30

जन्मताच सामाजिक कार्याची आवड असल्यास माणूूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी त्याचे मन इतरांना मदत करण्यासाठी कदापीही शांत बसत नाही. सामान्य कुुटुंबातून जन्माला येवून मोठ्या पदावर कार्यरत राहून फक्त स्वत:च्या कुटुंबातच रममान होणारे ईतरांना मदत करण्यासाठी सहसा पुढे येत नाही.

Social commitment to help an orphan girl | अनाथ मुलीला मदत करुन जपली सामाजिक बांधिलकी

अनाथ मुलीला मदत करुन जपली सामाजिक बांधिलकी

Next
ठळक मुद्देसहकार विभागातील अधिकाऱ्याचा पुढाकार : संसार उपयोगी साहित्य दिले भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जन्मताच सामाजिक कार्याची आवड असल्यास माणूूस कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी त्याचे मन इतरांना मदत करण्यासाठी कदापीही शांत बसत नाही. सामान्य कुुटुंबातून जन्माला येवून मोठ्या पदावर कार्यरत राहून फक्त स्वत:च्या कुटुंबातच रममान होणारे ईतरांना मदत करण्यासाठी सहसा पुढे येत नाही.मात्र आजही आपल्या उत्पन्नातून गरजवंताना हातभार लावून त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करणासाठी धडपडणारे काही व्यक्ती आहेत. याची साक्षात प्रचिती अर्जुनी मोरगाव येथील तालुका सहायक निबंधक कार्यालयात सहकार अधिकारी (श्रेणी-१) म्हणून कार्यरत असणारे प्रशांत गाडे यांच्या समाजशील कार्यप्रणालीवरुन दिसून येत आहे. एका अनाथ मुलीच्या लग्नाप्रसंगी तिला संसार उपायोगी वस्तू भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून अनाथ मुलीच्या लग्न कार्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. सामाजिक दायित्व अंगीकारणारे प्रशांत गाडे यांनी मदतीची ईच्छा व्यक्त केली.मोठ्या सहदयतेनी मुलीला आवश्यक असलेल्या वस्तु खरेदी केल्या. गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर या एका प्रबोधनासाठी शनिवारी (दि.१३) अर्जुनी मोरगावला आल्या होत्या. एका फोटो स्टुडिओमध्ये सहकार अधिकारी प्रशांत गाडे यांनी अनाथ मुलीसाठी घेतलेल्या वस्तु प्रा.सविता बेदरकर यांच्या स्वाधीन केल्या. याप्रसंगी भुरकुटे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी संतोष बुकावन, सुरेंद्र ठवरे, लोकमत समाचारचे तालुका प्रतिनिधी राधेशाम भेंडारकर उपस्थित होते. तालुक्यात सहकार अधिकारी म्हणून कार्यरत असणारे गाडे तालुक्यातील अनाथ मुलांना वेळोवेळी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पुढे येतात. तालुक्यातील सुशिक्षित युवकांना स्पर्धात्मक परीक्षा संबंधी मार्गदर्शन कोणताही मोबदला न घेता अव्याहतपणे करीत आहेत. आपल्या ज्ञानाचा ईतरांना फायदा होऊन समाजऋण फेडण्याचे काम करीत असल्याचे प्रशांत गाडे यांनी सांगितले.

Web Title: Social commitment to help an orphan girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.