सामाजिक न्याय दिनी जागृती सप्ताह पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:03+5:302021-06-30T04:19:03+5:30
सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करून त्यांच्या जनकल्याणकारी कार्यांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख ...
सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करून त्यांच्या जनकल्याणकारी कार्यांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख कमांडर किरण वासनिक, ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे वसंत गवळी, स्पर्धा परीक्षक प्रा. डॉ. दिशा गेडाम, आदेश गणवीर, सर्वसमाज विचार महोत्सव समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी, अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिव नागपुरे, युवा बहुजन मंचचे सुनील भोंगाडे, जेसीआय गोंदिया सेंट्रलच्या अध्यक्ष मंजरी मोदी, आंबेडकरी बाल संस्कार केंद्राचे संचालक महेंद्र कठाणे, प्रशिक्षक माणिक गोंडाणे, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, संरक्षक आभा मेश्राम, लक्ष्मी राऊत आदी उपस्थित होते. ज्यामध्ये ज्युनिअर-सिनियर वर्गातील सहभागी-यशस्वी विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व बक्षीस प्रदान करण्यात आले. ज्युनिअर गटात पलक किरणापुरे (खमारी), अशिता चौरे, अंगद भालाधरे, विशाखा सोनटक्के (हिंगोली), आर्यन बंसोड, अलिशा चव्हाण (ढाकणी), सक्षम लाऊल, स्नेहा मेश्राम (धाकणी), निखिल भालेराव, श्रेयश टेंभेकर, विदिशा गजभिये, आर्यन बंसोड, नंदिनी बंसोड, विश्वरत्न सोनटक्के (हिंगोली), श्रेया देशभ्रतार, लीशा राऊत, विराज राऊत, अक्षयंत नागपुरे (भंडारा), हर्षल सतदेवे, शिमोन भालाधरे, श्रावणी पानतोने, मयंक जांभूळकर, आदित्य कठाणे, युवराज गौतम, संयमी देशपांडे (नागपूर), डिंपल साखरे (तिरोडी, बालाघाट), वैभव टेंभेकर, सोनाली बावणे, दीक्षा शहारे (तुमखेडा-खुर्द), सुमित रामटेके (कटंगी), लता पारधी (खमारी), दीप्ती डोंगरे (अदासी), श्रेया देशभ्रतार, काजल कोरे (ठाणा), पारूल कोटांगले, श्रेयश वासनिक, श्रुती मेश्राम (धामणगाव रेल्वे), टिया काणेकर (साकोली), अनामिका सतदेवे (मुंडीपार), योगेश टेंभेकर, श्रेयश वासनिक, रौनक बनसोड, (ब्रह्मपुरी), मोनाली सरदारे, (कारंजा), प्रशित चौरे, यश रंगारी, (गुदमा), श्रुती खोब्रागडे, मन्नत रामटेके (नागपूर), प्रशिक रामटेके (नागपूर), शुभम मेश्राम (ढाकणी) , सौरभ उके (आमगाव), अनु यादव, पूजा कांबळे (अहमदनगर), रिधांश उके (लोहारा) यांचा समावेश आहे.