जिल्ह्यात सामाजिक न्याय दिन साजरा (शाहू)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:36+5:302021-06-27T04:19:36+5:30
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा डव्वा सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा डव्वा
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत छत्रपती शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संध्या दहिवले होत्या. त्यांनी लोककल्याणकारी राजा आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज हे एका समाजापुरते व जाती पुरते नाही, तर सर्व कोल्हापूर संस्थानचे राजे होते. ते सर्वांच्या उद्धारासाठी कर्तबगार राजे होते, असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमास आभासी ऑनलाइन पद्धतीने लेखक व कवी प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, आर.एच. धनविजय, के.डी. अंबुले, ए.एस. मेश्राम, पी.ए. ढवळे, टी.आर. महाजन उपस्थित होते. कार्यक्रमात वर्ग सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. संचालन प्रतीक्षा चौथरी यांनी केले. आभार हिमांशी बडोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकेतर कर्मचारी व क्रिस्टल कंपनी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.