समाजसेवी युवक ठरले स्थलांतरित मजुरांचे देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:00 AM2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:00:52+5:30
राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक मजूर आपल्या राज्यतून दुसºया राज्यात जातात. अशा मजुरांचे या ‘लॉकडाऊन’मध्ये हाल होत आहेत. रोजगार गेला, खाण्याचे वांदे, उपासमारीची पाळी आली. या परिस्थितीत मजुरांनी गावाकडे धाव घेतली. वाहतूक व्यवस्था नाही म्हणून शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच गाठण्याची मानसीक तयारी केली.
राधेश्याम भेंडारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने २५ मार्च पासून ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. यामुळे देशातील वाहतुकीच्या सर्व सुविधा ठप्प झाल्या. याचा सर्वाधिक फटका परराज्यात रोजगारासाठी गेलेल्या मजुरांना बसला. ‘लॉकडाऊन’मुळे मिळणारा रोजगार गेल्याने अनेक मजूर आपले गाव गाठण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास पायीच करु न आपल्या घराकडे परतत आहे. तहान भुकेची चिंता न करता जीवासाठी पायपीट करणाऱ्या या मजुरांसाठी येथील काही समाज सेवक युवक समोर आले. मजुरांच्या अन्नाची सोय करून ते या स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरत आहेत.
राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक मजूर आपल्या राज्यतून दुसºया राज्यात जातात. अशा मजुरांचे या ‘लॉकडाऊन’मध्ये हाल होत आहेत. रोजगार गेला, खाण्याचे वांदे, उपासमारीची पाळी आली. या परिस्थितीत मजुरांनी गावाकडे धाव घेतली. वाहतूक व्यवस्था नाही म्हणून शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच गाठण्याची मानसीक तयारी केली. हैद्राबाद, आंध्रप्रदेश आणि तेलगंणा राज्यातून मजुरांचे पायी चालणारे जत्थे रोज मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात जाण्यासाठी अर्जुनी-मोरगाव परिसराततून जात आहेत. डोक्यावर सामानाचे ओझे, कंबरेवर लहान मुले आणि भूक व तहानेने व्याकुळ मजूर बघून मन हेलावून जाते. या स्थलांतरण करणाºया मजुरांना अन्न व विश्रांती करण्यासाठी निवारा देण्याचे निस्वार्थ काम येथील समाज सेवी युवकांनी हाती घेतले आहे.
कुठेही असे मजूर दिसले की आम्हाला फोन करा असे आवाहन सोशल मीडियावर त्यांनी केले आहे. येथील उमेश दुबे, धिरेन जीवानी, रामू जीवानी, शाम चांडक, अश्विन गौतम, संजय पवार यांच्या सोबतीला नगराध्यक्ष किशोर शहारे, नगरसेवक प्रकाश उईके, छत्रपाल कापगते, डॉ.भूपेश मडावी हे दिवसरात्र, उन्हातान्हात अशा मजुरांच्या शोधात भटकंती करतात. मजुरांना एका ठिकाणी जमा करून ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळत त्यांना पोटभर अन्न देतात. एवढच नाही तर पुढच्या प्रवासासाठी पार्सल व शक्य झाल्यास पुढच्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देत आहेत. १०० लोकांच्या जेवणाची सोय रोजच सुरू आहे. आजतागायत हजारावर मजुरांची त्यांनी भूक शमविली आहे. स्वत: रात्री उशिरापर्यंत कुठलीच अपेक्षा न ठेवता स्थलांतरित मजुरांसाठी हे युवक देवदूताचे काम करीत आहेत.