समाजच समाजाला बदलू शकतो

By admin | Published: January 24, 2016 01:40 AM2016-01-24T01:40:59+5:302016-01-24T01:40:59+5:30

शासन राजकारण आणि सामाजिक क्षेत्रासंबंधात जेवढे संवेदनशील पाहिजे तेवढे दिसत नाही.

Society can change society | समाजच समाजाला बदलू शकतो

समाजच समाजाला बदलू शकतो

Next

नितीन गडकरी : राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप
गोंदिया : शासन राजकारण आणि सामाजिक क्षेत्रासंबंधात जेवढे संवेदनशील पाहिजे तेवढे दिसत नाही. शासनातून समाज घडणार नाही तर समाजच समाजाला घडवू शकतो, असे उद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप व बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे खा.नाना पटोले, संमेलनाध्यक्ष मुक्ताताई पुणतांबेकर, ‘जय मल्हार’ टीव्ही मालिकेचा नायक देवदत्त नागे, आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष तथा संमेलनाच्या स्वागताध्यक्ष रचना गहाणे आदी उपस्थित होते.
महात्मा गांधींनी व्यसनमुक्तीची जी चळवळ चालविली ती आजही चालविण्याची गरज आहे. समाजाचे स्वास्थ चांगले रहावे यासाठी व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव होणे ही चांगली बाब आहे. समाजात परिवर्तन आणायचे असेल तर समाजमनाने एकत्र येऊन कार्य केले पाहिजे, असे आवाहन यावेळी ना.गडकरी यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून केले.
प्रास्ताविकात पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, तरूणांमध्ये व्यसनाधिनता आहे.
देशाला बलशाली करायचे असेल तर व्यसनमुक्त समाजाची निर्मिती होणे अपेक्षित आहे. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
यावेळी राज्यातील विविध संस्था आणि व्यक्तींना व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिव्यक्ती १५ हजार तर संस्थेला ३० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाबा युवा वर्गा मोठ्या संख्येने होता. (तालुका प्रतिनिधी)

पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची नावे
व्यसनमुक्त पुरस्कार मिळालेल्यांमध्ये मुंबई येथील तुळशीदास विश्वनाथ भोईटे, सुरेश जयसिंग हेडंबा, पुणे येथील दत्ता श्रीखंडे, डॉ.दत्ता कोहीणकर, समिंतराव हंबीर, सुरेश मेकला, कोल्हापूर ज्ञानदेव पाटील, नाशिक चंद्रशेखर नामपूरकर, धुळे सुभाष कुळकर्णी, अहमदनगर हमीद सय्यद, गौरव बिडवे, धीरज शर्मा, जळगाव मुकूंद गोसावी, अमरावती विद्यासागर धर्माधिकारी, महादेवराव बडनेरकर, बुलढाणा वासुदेव देशपांडे, शुभानराव देशमुख, ईश्वर मगर, वाशिम खंडेराव मुंढे, यवतमाळ चंद्रबोधी धायवटे, अकोला अशोक रामटेके, नागपूर रवींद्र भुसारी, भूपेंद्र गणवीर, विनोद गजघाटे, गोंदियातील हिदायत शेख, बोधानंद रोडगे, अपूर्व मेठी, बळीराम वाघाये, गडचिरोलीचे दत्तात्रेय कुंभरे, संदीप पाटील, भंडारा ब्रह्मदास हुमने, चंद्रपूर अनिरूध्द वनकर, केशवराव शेंडे, लक्ष्मीकांत धानोरकर, औरंगाबादच्या मंदाकिनी चौकडे, सुचिता देशपांडे, परभणी ज्ञानोबा मुंढे, बीडच्या राहीबाई धुमाळ, जालना बंडू जाधव, हिंगोली दत्तात्रेय दंडे, जगन जाधव, कैलास कनसे यांचा समावेश होता.

पुरस्कार मिळालेल्या संस्थांची नावे
संस्थांमध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिध्दार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय डॉ. डी.एन. रोड फोर्ट मुंबई, सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई, दि. आॅरचिड स्कूल बानेर पुणे, बजाज इलेक्ट्रीकल्स लिमिटेड सिरूर पुणे, नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव धुळे, विश्वरचना ग्रामीण विकास संस्था केकाटपूर अमरावती, संत गाडगेबाबा बहुउद्देशिय संस्था पारस अकोला, वर्ल्ड रिन्युअल स्पीरीक्चुअल ट्रस्ट उमरेड नागपूर, अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चंद्रपूर व डोंगर तुकाई ग्रामविकास प्रतिष्ठान नाथनगर परभणी यांचा समावेश आहे.

Web Title: Society can change society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.