समाजहिताचे स्वप्न बघणाराच समाजाचे कार्य करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 08:58 PM2017-09-28T20:58:22+5:302017-09-28T20:58:37+5:30
समाज समितीच्या पदाधिकाºयांच्या क्षमता व बुद्धीमुळे समाजाच्या अग्रसेन भवनचे कायापालट झाले आहे. आज भवन नविनीकरणानंतर आकर्षणाचे केंद्र बनले असून समाजासाठी बहुपयोगी ठरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : समाज समितीच्या पदाधिकाºयांच्या क्षमता व बुद्धीमुळे समाजाच्या अग्रसेन भवनचे कायापालट झाले आहे. आज भवन नविनीकरणानंतर आकर्षणाचे केंद्र बनले असून समाजासाठी बहुपयोगी ठरत आहेत. जे नेतृत्व समाजहिताचे स्वप्न बघणार, तेच समाजहिताचे कार्य करणार, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
श्री अग्रसेन स्मारक समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या श्री अग्रसेन महाराज जयंतीच्या ६६ व्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला अनंत अग्रवाल. रमाकांत खेतान, जुगलकिशोर अग्रवाल, संस्था अध्यक्ष राम अग्रवाल उपस्थित होते. संस्था अध्यक्ष राम अग्रवाल यांनी, भवनाची प्रगती ही सर्वांच्या सहकार्याचे फलीत असल्याचे मत व्यक्त केले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार संस्था सचिव सुनील सिंघानिया यांनी मानले.
जयंतीनिमित्त अग्रसेन भवन येथून सुसज्जीत रथात अग्रसेन महाराजांची शोभायात्रा काढण्यात आली होती. कार्यक्रमानिमित्त ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष मोहन अग्रवाल, महिला समिती अध्यक्ष ममता अग्रवाल, युवा समिती अध्यक्ष पराग अग्रवाल यांच्यासह स्मारक समितीतील समस्त पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
- समाजातील वरिष्ठांचा केला सत्कार
कार्यक्रमात समाजातील वरिष्ठ रमेशचंद्र अग्रवाल, कैलाशचंद्र थरड, बद्रीनारायण श्यामका, लक्ष्मी अग्रवाल, इंदिरा सिंघानिया, सावित्री सिंघानिया यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सभागृहासाठी आर्थिक मदत करणारे जुगलकिशोर अग्रवाल, आर्किटेक्ट अजय अग्रवाल यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.