नवेगाव येथे मृदा आरोग्य शेतकरी प्रशिक्षण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:09+5:302021-02-14T04:27:09+5:30

तालुका कृषी अधिकारी डी. एल. तुमडाम यांनी भात शेतीत खते ही चिखलणीच्यावेळी वापरण्याचे फायदे सांगितले. अधिक आर्थिक उत्पन्नाकरिता भाजीपाला, ...

Soil Health Farmer Training at Navegaon () | नवेगाव येथे मृदा आरोग्य शेतकरी प्रशिक्षण ()

नवेगाव येथे मृदा आरोग्य शेतकरी प्रशिक्षण ()

Next

तालुका कृषी अधिकारी डी. एल. तुमडाम यांनी भात शेतीत खते ही चिखलणीच्यावेळी वापरण्याचे फायदे सांगितले. अधिक आर्थिक उत्पन्नाकरिता भाजीपाला, फळपिके घेण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्र हिवरा येथील मृदाशास्त्र शास्त्रज्ञ खेडीकर यांनी खतांची मात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्याचे फायदे इत्यादी माहिती व कीडरोग शास्त्रज्ञ चव्हाण यांनी भात, हरभरा पिकांवरील कीड व रोगांची ओळख व व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी विजय नंदनवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कृषी सहायक रोशन भानारकर यांची घरच्या घरी सेंद्रिय खते तयार करण्याच्या पध्दती सांगितल्या. भात पीक काढल्यानंतर जमिनी पडीक न ठेवता करडई, मोहरी, ज्वारीसारखे कमी पाण्याचे पीक लावण्याबाबत माहिती दिली. गोपाल पंडेले उमेद पं.स. यांनी अझोलाचे जनावरांचे आहारातील महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्र सुलाखे होते. संचालन व आभार प्रदर्शन कृषी सहायक आर.एस.भानारकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी सहायक आर. एच. लिल्हारे, दीपिका डहाके, रिंकू मंडल, रिनायत व शेतकरी योगराज तिवडे, भोजराज मांडवे, सुनील सुलाखे, नंदकिशोर सुलाखे, शोभेलाल मांडवे यांनी सहकार्य केले.

Web Title: Soil Health Farmer Training at Navegaon ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.