गावातील सौर दिवे अंधारात गडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:38+5:30

अनेक गावांतील चौकात रात्रीला उजेड असल्याने रात्री उशीरापर्यंत गप्पांचा फड रंगायचा. कुठल्याही वीज बिलाशिवाय प्रकाश देणारे हे सौरदिवे नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता. भारनियमनाच्या काळात ग्रामीण भागात सोईचे असणारे सौर दिवे नागरिकांसाठी वरदान ठरले होते. परंतु चोरट्यांनी बॅटऱ्या चोरून नेल्याने कित्येक गावांतले दिवे सद्यस्थितीत बंद पडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या नशिबी पुन्हा अंधार आला आहे.

The solar lights in the village are dark | गावातील सौर दिवे अंधारात गडप

गावातील सौर दिवे अंधारात गडप

googlenewsNext
ठळक मुद्देजैसे थे स्थिती । चोरट्यांचा बॅटऱ्यांवर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेद्वारा ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या सौर दिव्यांमुळे गावागावातील प्रमुख चौक उजळून निघाले होते. परंतु चोरट्यांची वक्र दृष्टी या सौर दिव्यांवर पडली आणि बॅटरी अभावी सौर दिवे पुन्हा बंद पडले आहे.
अनेक गावांतील चौकात रात्रीला उजेड असल्याने रात्री उशीरापर्यंत गप्पांचा फड रंगायचा. कुठल्याही वीज बिलाशिवाय प्रकाश देणारे हे सौरदिवे नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता. भारनियमनाच्या काळात ग्रामीण भागात सोईचे असणारे सौर दिवे नागरिकांसाठी वरदान ठरले होते. परंतु चोरट्यांनी बॅटऱ्या चोरून नेल्याने कित्येक गावांतले दिवे सद्यस्थितीत बंद पडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या नशिबी पुन्हा अंधार आला आहे.
सध्या मात्र अंधारात गडप झालेल्या दिव्याखाली अंधार अशी स्थिती आहे. मुळात या सौर दिव्यांची उंची कमी आहे. त्यामुळे चोरट्यांना या सौर दिव्याच्या बॅटरीपर्यंत सहज पोहचता येत असल्याने चोरी झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सौर उर्जेच्या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात पळविण्यात आल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आल्याने सायंकाळ होताच गावागावात स्मशान शांतता पसरत होती.
जेवणानंतर लोक झोपी गेल्यावर पोलीसह गावात भटकत नव्हते. गावातील रस्ते निर्मनुष्य होत होते.परिणामी चोरट्यांनी सौरऊर्जेच्या बॅटऱ्यांवर आपले लक्ष केंद्रीत केले. भारनियमनाच्या काळातही चकाकणारे गावे बॅटऱ्या पळविल्या गेल्यामुळे अंधारात आहेत.आता पावसाचे दिव असताना गावागावात रात्रीला पथदिव्यांची सोय करणे आवश्यक आहे. यासाठी ग्राम पंचायतने पुढाकार घेण्याची गरज आहे.

अनुदान तत्त्वावर सौर दिव्यांचे वाटप
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना अनुदान तत्वावर हे सौर दिवे देण्यात आले होते. भारनियमनाच्या तडाख्यात हे सौर दिवे दिलासा देत होते त्यामुळे ग्रामपंचायतींनी देखील गावातील मुख्य चौकामध्ये हे दिवे लावले होते.
प्लास्टिक पेटीमधील बॅटऱ्या लंपास
कमी उंचीच्या सौरदिव्यांमध्ये बॅटरी ठेवण्याकरिता लोखंडी व प्लास्टिकचे बॉक्स आहे. सहजपणे हात पोहचणाºया प्लास्टिकच्या बॉक्स मधील बॅटºया चोरट्यांनी शिताफीने चोरल्या आहेत. गावातील चौकात रात्री १० वाजतानंतर सामसूम होते. या वातावरणाचा नेमका फायदा चोरट्यानी घेतला. त्यामुळे दररोज गावातील सौर दिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत नोंद केली जाते.

Web Title: The solar lights in the village are dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर