पाणी टंचाईवर बंधाऱ्याचे सोल्यूशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 09:39 PM2018-03-31T21:39:38+5:302018-03-31T21:39:38+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत वैनगंगा नदीवर डांगोर्ली येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा नदीचे पात्र लवकरच कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली.

Solution on Water Scarcity | पाणी टंचाईवर बंधाऱ्याचे सोल्यूशन

पाणी टंचाईवर बंधाऱ्याचे सोल्यूशन

googlenewsNext
ठळक मुद्देमजीप्राची उपाययोजना : पाणी पातळीत एक फूट वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत वैनगंगा नदीवर डांगोर्ली येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा नदीचे पात्र लवकरच कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाणी टंचाईवर सोल्यूशन शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. परिणामी भूजल पातळीत सुध्दा घट झाली असून अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला मजीप्राच्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेतंर्गत शहरातील दोन लाख नागरिकांना पाणी पुरवठा होतो. मात्र यंदा मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. यावर मात करण्यासाठी मजीप्राने डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीवर बंधारा तयार करून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.
मागील पंधरा दिवसांपासून शहराला केवळ एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. या बंधाºयामुळे पाणी अडवून राहिल्याने एक ते दीड फूट पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे किमान काही दिवस तरी पाणी टंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे. यंदा उन्हाळा चांगलाच तापत असल्याने पुढील दोन तीन महिने नदीला पाणी राहणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे पुजारीटोला धरणातून पाणी आणण्याची मजीप्राची योजना आहे. मात्र तोपर्यंत पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी मजीप्राच्या अधिकाºयांनी डांर्गोलीजवळ बंधारा तयार करण्याचे काम २० मार्चपासून सुरू केले असून ते काम जवळपास पूर्ण झाले आहे. या बंधाºयाच्या निर्मितीमुळे मागील चार पाच दिवसांत पाणी पातळीत एक दीड फुटाने वाढ झाली आहे. याचा लाभ कुडवा आणि कंटगीकला येथील पेरी अर्बन पाणी पुरवठा योजनेला होणार आहे.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाय योजना सुरू करण्यात आल्या.डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीवर बंधारा तयार करण्यात आला. त्यामुळे पाणी पातळीत थोडी वाढ झाली आहे.
- अभिजीत बागडे, सहायक अभियंता मजीप्रा

Web Title: Solution on Water Scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी