शाळांच्या शैक्षणिक समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:53 PM2019-08-03T23:53:13+5:302019-08-03T23:54:31+5:30
अर्जुनी : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अखत्यारीत विविध शैक्षणिक समस्या प्रलंबित आहेत. या समस्यांचे निवेदन जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शुक्रवारी (दि.२) शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अखत्यारीत विविध शैक्षणिक समस्या प्रलंबित आहेत. या समस्यांचे निवेदन जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शुक्रवारी (दि.२) शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांना देण्यात आले. यावर आमदार गाणार यांनी, गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
या वेळी जिल्हा परिषद व्यवस्थापनाने आर.टी.ई.कायदा वेशीवर टांगत अतंराच्या व पायाभूत सुविधांचा विचार न करता इयत्ता पाचवी व आठवीच्या अनाधिकृत तुकड्या सुरू करून अनैसर्गिक स्पर्धा निर्माण केली. परिणामत: अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर अनाधिकृत तुकड्या तात्काळ बंद करून यापुढे अशा तुकड्या उघडण्यात येऊ नयेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियंत्रणात इयत्ता पहिली ते आठवीच्या मोफत पुस्तकांचे वितरण मागील सत्राच्या पटसंख्येच्या आधारे शाळांना सत्राच्या सुरुवातीला झाले. सदोष वितरण पद्धतीमुळे विहीत संख्ये एवढी पुस्तके संबंधित शाळांना प्राप्त न होण्याची फार पूर्वीची समस्या आहे. यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी व्यक्तिगत लक्ष घालावे व या सत्रात कमी गेलेल्या पुस्तकांची पुर्तत: त्वरीत करावी. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे अनुसूचित जातीच्या मुलींना दरवर्षी मोफत सायकल खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेसह अनुदान खाजगी शाळांनाही देण्यात यावे.
गोंदिया स्काऊट व गाईड कार्यालय व भविष्य निर्वाह व वेतन पथक कार्यालय यांना नवीन शासकीय ईमारत जयस्तंभ चौक येथे स्थांनातरीत करण्यात परवानगी द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.या समस्यांवर चर्चा करीत शाळांच्या समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन आमदार गाणार यांनी शिष्टमंडळाला दिले.