सफाई कामगारांचे प्रश्न गांभीर्याने सोडवा

By Admin | Published: April 3, 2017 01:36 AM2017-04-03T01:36:39+5:302017-04-03T01:36:39+5:30

स्वच्छता राखण्यात सफाई कामगारांचे महत्वाचे योगदान आहे. ज्या यंत्रणांकडे सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबीत आहे

Solve the problem of cleaning workers seriously | सफाई कामगारांचे प्रश्न गांभीर्याने सोडवा

सफाई कामगारांचे प्रश्न गांभीर्याने सोडवा

googlenewsNext

दिलीप हाथीबेड : आढावा बैठकीत दिले निर्देश
गोंदिया : स्वच्छता राखण्यात सफाई कामगारांचे महत्वाचे योगदान आहे. ज्या यंत्रणांकडे सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबीत आहे त्यांनी या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक गांभीर्याने वेळीच करावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी (दि.१) जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेताना ते बोलत होते. आढावा सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे प्रमुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना हाथीबेड यांनी, लोकसंख्येच्या आधारावर सफाई कामगार असले पाहिजे. शासन निर्णयाप्रमाणे त्यांना वेतन मिळाजे पाहिजे. शहराची स्वच्छता राखण्यात सफाई कामगारांची महत्वाची भूमिका आहे. स्वच्छता राखतांना कामगारांना आवश्यक त्या सोयी-सुविधा नगर पालिकेने उपलब्ध करु न दिल्या पाहिजे. सफाई कामगारांची रिक्त पदे वेळीच भरावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नोव्हेंबर २०१७ मध्ये या आयोगाचा अहवाल पंतप्रधानांना देणार असल्याचे सांगत हाथीबेड यांनी, तत्पूर्वी आणखी एक आढावा येथे घेण्यात येईल. तोपर्यंत सफाई कामगारांचे प्रश्न सुटलेले असतील. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे. सफाई कामगारांची शैक्षणिक पात्रता व कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांना पदोन्नती कशी मिळेल याचे प्रस्ताव तयार करावे असेही सांगितले. जिल्हाधिकारी काळे यांनी, जिल्ह्यातील सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येईल. कामगारांचे वेतन शासनाकडून प्राप्त होताच त्यांना वेळीच वितरीत करण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार यांनी, जिल्हा परिषदेशी संबंधित असलेल्या सफाई कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल. या कामगारांच्या प्रश्नांना योग्य तो न्याय देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
आढावा सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, रोजगार मार्गदर्शन अधिकारी माटे यांच्यासह विविध सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त वानखेडे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)

विविध समस्यांवर झाली चर्चा
या आढावा सभेत रोजंदारी सफाई कामगारांचे प्रश्न, नियमीत काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेणे, सफाई कामगारांच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवावरु न पदोन्नती देणे, पाचवा व सहाव्या वेतन आयोगाचा लाभ सफाई कामगारांना देणे, लाड व पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, सफाई कामगारांच्या वारसा हक्कांची प्रकरणे निकाली काढणे, दर ३ वर्षांनी सफाई कामगारांना गणवेश देणे, यासह त्यांच्या अन्य समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली.

 

Web Title: Solve the problem of cleaning workers seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.