प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:18 PM2017-11-14T23:18:51+5:302017-11-14T23:19:15+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या पदावर व वेतनावर शासनाकडून व शैक्षणिक विभागाकडून अन्याय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या पदावर व वेतनावर शासनाकडून व शैक्षणिक विभागाकडून अन्याय होत आहे. अनेक मुद्यांवर चर्चा करुन पुराव्यानिशी कागदपत्रे दाखल करुनही प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या नाही. त्यामुळे महाराष्टÑ राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने येत्या हिवाळी अधिवेशनात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र भड यांनी दिला आहे.
महाराष्टÑ राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने संत तुकाराम हायस्कूल गोंदिया येथे रविवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष गोपीचंद कुकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अशोक कापगते, गौतम, सचिव सुभाष टेंभुर्णीकर व जिल्ह्यातील प्रयोगशाळा कर्मचारी उपस्थित होते.
ते म्हणाले, विज्ञान विषय प्रात्याक्षिकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. विज्ञान विषयाला प्रयोगशाळा व प्रयोगशाळा कर्मचारी सहाय्यक व परिचर आवश्यक आहे. मात्र कर्मचाºयांची कपात करुन विद्यार्थी व शिक्षकांवर विनाप्रयोगाने विज्ञान विषय शिकवण्याची पाळी आली आहे.
सध्या प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कर्मचाºयांवर मोठा अन्याय केला जात आहे. शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्टÑाच्या शैक्षणिक धोरणानुसार विज्ञानाशिवाय शिक्षण व प्रयोगाशिवाय डॉक्टर, इंजिनियर व शास्त्रज्ञ बनविणार काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रयोगशाळा सहाय्यकाची चौथ्या वेतन आयोगापासून ९७५ ऐवजी १२०० रुपये वेतनश्रेणी मंजूर करुन ५ व्या वेतन आयोगात चार हजार ते १० हजार ही वेतन श्रेणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देणे गरजेचे होते. तसेच आश्वासीत प्रगती योजनेत कर्मचाºयांना कुठलाही लाभ न देता कर्मचाºयांवर उघड अन्याय केला जात आहे.
यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी व कर्मचाºयांवरील अन्याय दूर करण्यासाठी महाराष्टÑ प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भरत जगताप यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी लाक्षणिक उपोषण करुन, मागण्या मान्य न केल्यास हिवाळी अधिवेशनावर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष भड यांनी दिली.