महिलांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:39 PM2018-04-19T21:39:22+5:302018-04-19T21:39:22+5:30

गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक यांनी केले.

To solve the problems of women | महिलांच्या समस्या मार्गी लावणार

महिलांच्या समस्या मार्गी लावणार

googlenewsNext
ठळक मुद्देफरिदा नाईक : येरंडी गावची केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक यांनी केले.
ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्राम येरंडी येथे आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरंक्षण विभागाचे अवर सचिव जितेंद्रकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी, तहसीलदार भंडारी, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, जि.प.सदस्य गिरीष पालीवाल, पं.स.उपसभापती करुणा नांदगावे, सरपंच रेखा खोब्रागडे, उपसरपंच बागडे, पोलीस पाटील खेमराज गेडाम, ग्रामपंचायत पदाधिकारी व जि.प.च्या सर्व शाखांचे अनेक अधीकारी-पदाधिकारी यावेळी ग्रा.पं.कार्यालयामध्ये उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे पर्यंत राबविण्यात येणाऱ्या ग्राम स्वराज्य अभियानाची सुरुवात येरंडी पासून झाली. याप्रसंगी गावामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य योजना, गॅस योजना, उजाला योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य योजना या सात योजनांची नागरिकांना माहिती दिली गेली. तसेच गावकºयांच्या समस्या जाणून तक्रारींची नोंद करण्यात आली.
याप्रसंगी नाईक यांनी गावातील घरकूल, शौचालय गॅस इत्यादींची पाहणी केली. संचालन करून आभार विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी मानले.
गावकऱ्यांनी मांडली गाऱ्हाणी
घरकुलाची पाहणी करतांना तयार झालेले घर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दाखविले. परंतु ज्यांना घरकुल, शौचालय व गॅस कनेक्शन मिळाले नाही हे मात्र दाबून ठेवले. मात्र योजना फक्त पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनाच कशा मिळतात असे नागरिकांनी बोलून दाखविले. गावात सिमेंट रस्ते बांधून विकास होत नाही. अनेक समस्या येरंडी गावात आहेत. पण पंचायत समिती व तहसील कार्यालयातील अधिकारी लक्ष घालून न्याय देत नाही. मिलाजुला कामकाज आहे, म्हणून विकास खुंटतो, योजना फक्त घशात पण विकासासाठी नाही असे नागरिकांनी या ग्रामसभेत सांगीतले.

Web Title: To solve the problems of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.