शिक्षकांच्या समस्या मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:24+5:302021-06-06T04:22:24+5:30
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन ...
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन वाहाणे यांच्यासोबत शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी भेट घेऊन चर्चा केली. शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला मुख्य लेखा व वित्त अधिकारी वाहाणे यांनी दिले.
यावेळी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातून दरमहा जीपीएफ व डीसीपीएसची रक्कम कपात होते. मात्र, त्याचा हिशोब हा नियमितपणे मिळत नाही. सहाव्या व सातव्या वेतन आयोगचे जीपीएफ थकबाकीचे हप्ते यांचा हिशोब मार्च, २०२१ देणे. जीपीएफ थकबाकी हप्त्याची नोंद घेऊन पावत्या देणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढणे व एक लाखापर्यंत वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजुरीचे अधिकार खातेप्रमुखांना देणे, सेवानिवृत कर्मचाऱ्यांची प्रकरणे त्वरित मागे लावण्यात यावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य वित्तलेखा अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, सरचिटणीस संदीप मेश्राम, संदीप तिडके, मुकेश रहांगडाले, उमेश रहांगडाले, गजानन पाटणकर, जीवन म्हशाखेत्री, तेजराम नंदेश्वर यांचा समावेश होता.