विविध शैक्षणिक समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:52 AM2021-03-13T04:52:45+5:302021-03-13T04:52:45+5:30
गोंदिया : मुख्याध्यापकांना येत असलेल्या विविध शैक्षणिक समस्या मार्गी लावा या मागणीला घेऊन जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ...
गोंदिया : मुख्याध्यापकांना येत असलेल्या विविध शैक्षणिक समस्या मार्गी लावा या मागणीला घेऊन जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.१०) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे यांच्या दालनात चर्चा करण्यात आली. यात विविध समस्यांवर तोडगा काढत निर्णय घेण्यात आले.
यामध्ये, जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सकाळी पाळीत लावण्याचा अधिकार शाळा प्रशासनाला देण्यात आला. इयत्ता ५ ते ९ तसेच ११ वीच्या द्वितीय सत्रांत परीक्षा इयत्ता १० व १२ वीच्या बोर्ड परीक्षा प्रारंभ होण्याच्या आधीच घ्याव्या. कोविड लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने होत असल्यामुळे शाळा प्रशासनाने आरोग्य विभागाशी संपर्क करून त्यांच्या आदेशाचे पालन करावे. वेतनेत्तर अनुदान वितरणाची कार्यवाही शासनाच्या आदेशानुसार करण्यात येईल. ईबीसीप्रकरणी आवश्यक आर्थिक मागणी वरिष्ठ कार्यालयात करण्यात आलेली आहे व प्रशासकीय मंजुरीनतंर ईबीसीप्रकरणे पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने घोषित पगारदार कर्मचाऱ्यांना अपघात विमा संबंधातील शाळानिहाय कर्मचाऱ्यांची माहिती शाळा मुख्याध्यापकांनी अतिशिघ्र ज्या बॅंकेतून पगार होतात त्या शाखेच्या व्यवस्थापकांकडे पाठविण्या संबंधात परिपत्रक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्रेषित होईल.
विशेष म्हणजे, याप्रसंगी ग्राम खमारी येथील स्व. पोमल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उर्मिला भैय्यालाल कटरे यांच्या निलबंनाबाबत संस्थेने केलेली कार्यवाही नियमानुसार आहे किवा कसे? याबाबतीत जिल्हा मुख्याध्यापक संघासह कटरे व शिक्षणाधिकारी कचवे यांच्या समक्ष चर्चा करण्यात आली. चर्चेला जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश तणवानी, कार्यवाह मुख्याध्यापक बी. डब्ल्यू. कटरे, गोंदिया तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य बी. पी. बिसेन, मुख्याध्यापिका उर्मिला कटरे उपस्थित होत्या.