कुणाला दिसले का ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:37 PM2018-09-17T21:37:39+5:302018-09-17T21:37:59+5:30
महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस घटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अच्छे दिन’ आणू शकले नाहीत. राज्यात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूका घेतल्यास आपली तयारी असायला पाहिजे असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस घटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अच्छे दिन’ आणू शकले नाहीत. राज्यात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूका घेतल्यास आपली तयारी असायला पाहिजे असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
तिरोडा येथील काँग्रेस भवनात आयोजित विशेष सभेत ते बोलत होते. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ समन्वयक, काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस, पं.स. जि.प. सदस्य, सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांची सभा आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बबनराव तायवाडे, सचिव उमाकांत अग्नीहोत्री, डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, बुथ समन्वयक पी.जी.कटरे, तालुका अध्यक्ष राधेलाल पटले, शहर अध्यक्ष लक्ष्मीनारायण दुबे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले, आलोक मोहंती, डेमेंद्र रहांगडाले, महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा रहांगडाले, शहर अध्यक्ष रुबीना मोतीवाला, कैलास पटले उपस्थित होते.
महागाई डायन खाय जात है, या स्मृती ईरानी यांच्या वाक्याचा उमाकांत अग्नीहोत्री यांनी चांगलाच समाचार घेतला. सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले यांनी भाजपा सरकार खोटे आश्वासने देत असून सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. काळा धन परत आला नाही. कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले नाहीत. शेतकºयांचे कर्जमाफीची योजना फसवी ठरली आहे. कर्ज मिळणार कर्ज माफ झाले असे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कित्येकांना याचा फटका बसला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन व बूथ कमेटी यावर मार्गदर्शन करुन मोदी सरकारच्या धोरणावर टिका केली.
प्रास्ताविक लक्ष्मीनारायण दुबे, संचालन मानिक झंझाड तर आभार ओमप्रकाश पटले यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन तालुकाध्यक्ष राधेलाल पटले यांनी केले. यशस्वितेसाठी सरीता अंबुले, पंचशिला रामटेके, जितेंद्र कटरे, शोभेलाल दहिकर, भुपेंद्रसिंग बैस, डॉ. गिरधर बिसेन, दिलीप असाटी, हुपराज जमईवार, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे गोंदिया जिल्हाध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, प्रा. विलास मेश्राम, हितेंद्र जांभूळकर, धमेंद्रसिंग चव्हाण, प्रेमलाल पटले, डॉ. ढाले, लेखराज हिरापुरे, विरेंद्र शेंडे, अशोक पारधी, बाबूलाल ठाकरे, संतोष निनावे यांनी सहकार्य केले.