थोडी खुशी, थोडा गम..

By admin | Published: March 1, 2016 01:09 AM2016-03-01T01:09:38+5:302016-03-01T01:09:38+5:30

केंद्र सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे अनेक स्तरातून स्वागत झाले.

Somewhat happy, a little gum .. | थोडी खुशी, थोडा गम..

थोडी खुशी, थोडा गम..

Next

केंद्रीय अर्थसंकल्प : राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया
गोंदिया : केंद्र सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे अनेक स्तरातून स्वागत झाले. मात्र या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस उपाययोजना नसून त्यांच्यावर भुर्दंड पडणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

सर्वसामान्यांसाठी निराशाजनक
हा अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा नाही. करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली नसल्यामुळे सर्वांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न सध्याच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट करणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सर्व्हेक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न केवळ २२ हजार रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न जर पुढील ६ वर्षात ४४ हजार होणार असेल तर ही स्थिती काही चांगली असेल असे म्हणता येणार नाही.
- राजेंद्र जैन,
विधान परिषद सदस्य, गोंदिया-भंडारा
शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा होता
शेतकऱ्यांसाठी क्रॉप इन्शुरन्स स्कीम अतिउत्तम आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय, रासायनिक खते आणि औषधे यांच्यासाठी एमआरपीचा कायदा बदलणे गरजेचे होते. शेतमालाच्या मार्केटींगची पण विशेष व्यवस्था करायला हवी. शेतकऱ्याला परवडेल असे बाजारभाव निश्चित केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. पाणी, जमीन आणि त्याचबरोबर शेणखत, रासायनिक खत सोडून अन्य बाबतीत जर लक्ष घातल्या गेले तर पाच वर्षात विदर्भातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. त्यादृष्टीने सरकारने विचार करणे अपेक्षित आहे.
-महादेवराव शिवणकर
माजी अर्थमंत्री, महाराष्ट्र शासन
शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प
केंद्र सरकारने आधिच शेतकऱ्यांची मोठी नाराजी ओढवून घेतली आहे. आता या अर्थसंकल्पात तरी त्यांना दिलासा मिळेल असा काही निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.
- गंगाधर परशुरामकर
गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस, जि.प.गोंदिया
अर्थसंकल्प घालणार महागाईत भर
केंद्र सरकारने सामान्य माणसांना दिलासा देण्याऐवजी करात वाढ केली. हवाई आणि रेल्वे वाहतूक महाग झाली. केबल टिव्ही, फ्रिज महाग झाले. सर्वसामान्यांसाठी संपर्काचे माध्यम असणारे मोबाईल महाग होणार. एकूणच महागाईत भर घालणाला अर्थसंकल्प आहे.
- प्रा.डॉ.माधुरी नासरे
अध्यक्ष, महिला अर्बन बँक
अर्थसंकल्पाने केली सर्वसामान्यांची निराशा
सामान्य नागरिकांना आधीच अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवत निराश करण्यात आले. आता पुढेही दिलासा मिळण्याऐवजी आणखी निराश व्हावे लागणार याचे संकेत या अर्थसंकल्पाने दिल्याचे दिसून येत आहे.
- सहेसराम कोरोटे
महामंत्री, जिल्हा काँग्रेस कमिटी
ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार गती
ग्रामीण भागातील रस्ते, रोजगार हमीची कामे यासाठी सरकारने मोठा निधी दिला आहे. घर बांधकामावरील कर हटविला. मात्र आयकराची मर्यादा वाढविणे गरजेचे होते.
- अविनाश ठाकूर
विकास अधिकारी, एलआयसी

Web Title: Somewhat happy, a little gum ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.