मुलगा व सुनेने दिली वृद्धाला ठार करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:19+5:302021-07-10T04:21:19+5:30

........... महिलेला घर खाली करण्यासाठी धमकी गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गौतमनगरच्या डब्लिंग कॉलनी येथील वर्षा चंद्रशेखर भिवगडे ...

Son and daughter-in-law threaten to kill old man | मुलगा व सुनेने दिली वृद्धाला ठार करण्याची धमकी

मुलगा व सुनेने दिली वृद्धाला ठार करण्याची धमकी

googlenewsNext

...........

महिलेला घर खाली करण्यासाठी धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गौतमनगरच्या डब्लिंग कॉलनी येथील वर्षा चंद्रशेखर भिवगडे (४०) यांना ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आरोपी देवका पांडुरंग भिवगडे (६०, रा. कोरबा, छत्तीसगड) हिने घर माझ्या बहिणीचे आहे. हे घर खाली करा अन्यथा तुम्हाला ठार करीन, अशी धमकी दिली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

...........

घरावर टीनपत्रे टाकल्याने ठार करण्याची धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाना चौक कुंभारेनगर येथील प्रतिभा राजकुमार वाघमारे (४९) यांनी आपल्या घरावर टिनाचे शेड टाकल्याने आरोपी निशा खोबरे (४५) हिने घरावर टीनपत्रे का टाकले, तुझ्याकडील पाणी आमच्याकडे पडते असे बोलून ठार करण्याची धमकी दिली. ही घटना ९ जुलैच्या सकाळी ११ वाजता घडली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

............

उसनवारीचे ५० हजार मागितल्याने ठार करण्याची धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चंद्रशेखर वाॅर्ड श्रीनगर येथील शीतल राकेश यादव (३६) यांनी उसनवारीवर दिलेले ५० हजार रुपये परत मागितले असता आरोपी गोपी रामदास कोसरे (३३), रामकली रामदास कोसरे (५०), ममता बबलू गोटे (३०, सर्व रा. कस्तुरबा वाॅर्ड, गोंदिया) यांनी पैसे न देता शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात ९ जुलै रोजी दुपारी गोंदिया शहर पोलिसात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Son and daughter-in-law threaten to kill old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.