भजेपारच्या शेतकरी पुत्रांची भरारी, देश सेवेसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:19+5:30

सालेकसा तालुक्याची लाईफ ठरणारी वाघनदी व त्या नदीच्या दोन्ही काठावरील छोटी छोटी गावे आहे. या गावाची सुपीक जमीन तेथील लोकांच्या जीवनाचा आधार आहे. यातील एक गाव म्हणजे भजेपार. या गावात जेमतेम तीन हजार लोक वास्तव्यात असून संपूर्ण गावाचा एकच व्यवसाय अन् तो म्हणजे शेती. एक एकर, दोन एकर जमिनीचे मालक असलेले शेतकरी तर काही फक्त त्यांच्याकडे काम करणारे शेतमजूर सुद्धा या गावात राहतात.

The son of the farmers of Bhajepar select for Military Service | भजेपारच्या शेतकरी पुत्रांची भरारी, देश सेवेसाठी रवाना

भजेपारच्या शेतकरी पुत्रांची भरारी, देश सेवेसाठी रवाना

Next
ठळक मुद्देएकाचवेळी सात युवकांची सैन्यदलात निवड : कठोर परिश्रमाचे फळ

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : बाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या भजेपार नावाच्या छोट्याशा गावातून एकाच वेळी सात युवकांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. गरीब शेतकऱ्यांच्या मुलाने घेतलेल्या या भरारीमुळे गावातील प्रत्येक महिला पुरुषांना अभिमान वाटत आहे. इतर गावातील युवकांसाठी प्रेरणादायी बाब ठरत आहे. त्यामुळे आदर्श ग्राम भजेपारच्या शिरपेचात मानाचा तुरा लागलेला आहे.
सालेकसा तालुक्याची लाईफ ठरणारी वाघनदी व त्या नदीच्या दोन्ही काठावरील छोटी छोटी गावे आहे. या गावाची सुपीक जमीन तेथील लोकांच्या जीवनाचा आधार आहे. यातील एक गाव म्हणजे भजेपार. या गावात जेमतेम तीन हजार लोक वास्तव्यात असून संपूर्ण गावाचा एकच व्यवसाय अन् तो म्हणजे शेती. एक एकर, दोन एकर जमिनीचे मालक असलेले शेतकरी तर काही फक्त त्यांच्याकडे काम करणारे शेतमजूर सुद्धा या गावात राहतात. दिवसभर शेतीची कामे परिश्रमाने करुन जिवन जगत आहे. असे असताना गावात मात्र सलोख्याचे वातावरण निर्माण ठेवीत सदैव एकमेकांना सहकार्य करीत असतात. या सहकार्याच्या भावनेतूनच गावातील लोकांनी स्वत:चा निधी उभारुन गावातील मुला-मुलींसाठी अध्ययन कक्ष स्थापन केले. या अध्ययन कक्षामध्ये अभ्यास करुन युवक-युवती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतात. मागील दहा वर्षात आतापर्यंत जवळ जवळ २० युवक-युवतींची विविध शासकीय विभागात निवड झाली. ते तरुण गावातील इतर मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
वेळोवेळी होतकरु मुला-मुलींना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत सुद्धा करतात. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाची भर्ती निघाली. त्या भर्तीसाठी दाखल झाले. या सातही युवकांची सैन्य दलात एकाचवेळी निवड झाली. सतत अध्ययन कक्षात लेखी परीक्षेसाठी अभ्यासही केला.यामुळेच एकाच वेळी भजेपारच्या अध्ययन कक्षातून अभ्यास करुन गेलेले सात युवक सैन्य दलात भर्तीसाठी पात्र होऊन त्याची निवड झाली. ही समस्त गावकरी आणि सालेकसा तालुकावासीयांसाठी सुध्दा गौरवाची बाब ठरली.

या युवकांचा समावेश
ज्या युवकांची सैन्य दलात निवड झाली आहे त्यामध्ये आशीष राजाराम चुटे, डिलेश महादेव शेंडे, गुलशन राजाराम पाथोडे, राहुल भास्कर बहेकार, सुभाष धनराज रहिले, हेमंत राधेशाम शेंडे आणि दुर्गेश किशोर फुंडे यांचा समावेश आहे.किसान आणि जवान या दोन घटकावरच आपला देश सुरक्षित आणि अबाधित असून भजेपार गावाने किसान आणि जवान दोन्ही प्रकारे देशसेवेत स्वत:ला समर्पित केले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अध्ययन कक्षातून घडत आहेत विद्यार्थी
भजेपार येथे श्रमदानातून साकारलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन कक्षात अभ्यास करणाऱ्या सात युवकांनी एकाच भरती प्रक्रियेत भारतीय सैनिक दलात भरती होण्याचा नाव विक्रम केला. छोट्याशा शेती प्रधान गावाने एकाच वेळी भारत मातेच्या सेवेसाठी सात जवान देणे ही अभिमानास्पद ऐतिहासिक व तेवढीच गौरवास्पद बाब आहे. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला नारा ‘जय जवान जय किसान’ या नाऱ्याला भजेपारवासीयांनी खऱ्या अर्थाने सिद्ध करुन दाखविले आहे.

Web Title: The son of the farmers of Bhajepar select for Military Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.