सोनवणे यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:44+5:302021-06-23T04:19:44+5:30

कोरोना संसर्ग काळात डॉक्टर, पोलीस शिक्षकांसह अनेक कर्मचारी शासनाला कोविड परिस्थितीत लढण्यास मदत करताना दिसत आहेत. या कर्मचाऱ्यांना ...

Sonawane felicitated as Kovid Warrior () | सोनवणे यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार ()

सोनवणे यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार ()

Next

कोरोना संसर्ग काळात डॉक्टर, पोलीस शिक्षकांसह अनेक कर्मचारी शासनाला कोविड परिस्थितीत लढण्यास मदत करताना दिसत आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी नवीन उपक्रम राबवित कोरोना लसीकरण मोहिमेत विशेष सहकार्य करणाऱ्या निवडक ५ शिक्षक व केंद्रप्रमुखांचा सत्कार समारंभ आयोजित केला. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणपार येथील प्रभारी मुख्याध्यापक सोनवणे यांचा त्यांनी केलेल्या लसीकरणसंदर्भातील उत्कृष्ट कार्याबद्दल मंत्री उदय सावंत यांच्या हस्ते गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. देवरी तालुक्याअंतर्गत गोठणपार हे गाव अतिशय नक्षलग्रस्त व दुर्गम भागात असून १०० टक्के आदिवासीबहुल गाव आहे. या गावात सोनवणे यांनी शाळेतील सहायक शिक्षक व्ही. टी. शिवणकर, सरपंच कृष्णा सरपा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गेंदूप्रसाद मरकाम, केंद्रप्रमुख शिवकुमार राऊत यांच्या सहकार्याने लसीकरणसंदर्भात विशेष जनजागृती मोहीम घडवून आणली व ४५ वर्षांवरील १०० टक्के लोकांचे लसीकरण केले. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक, तालुका आरोग्य अधिकारी ललित कुकडे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Sonawane felicitated as Kovid Warrior ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.