सोनिया गांधींनी चाखली मोहाच्या लाडूची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:09 PM2018-11-03T22:09:17+5:302018-11-03T22:09:52+5:30

विदर्भात मोहफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मोहापासून विविध पदार्थ तयार केले जातात. दरम्यान मोहापासून तयार केलेल्या लाडूची मोठी मागणी आहे.

Sonia Gandhi tweeted the taste of Mohla lava | सोनिया गांधींनी चाखली मोहाच्या लाडूची चव

सोनिया गांधींनी चाखली मोहाच्या लाडूची चव

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय सेंद्रिय शेती उत्सव : राऊत दाम्पत्याचा उपक्रम

मुन्नाभाई नंदागवळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : विदर्भात मोहफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मोहापासून विविध पदार्थ तयार केले जातात. दरम्यान मोहापासून तयार केलेल्या लाडूची मोठी मागणी आहे.
दिल्ली येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय महिला सेंद्रिय उत्सवाला काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांनी भेट देऊन विदर्भातील लाडूची चव चाखली. तसेच मोहापासून तयार केलेल्या लाडूची प्रशंसा केली. प्राप्त माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कुंभीटोला येथील राऊत दाम्पत्य दिल्ली येथील येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय महिला सेंद्रिय उत्सवात सहभागी झाले होते.
या महोत्सवात राऊत दांपत्यांनी सेंद्रिय पदार्थांचा स्टॉल लावला होता. त्यात त्यांनी मोहफुलाचे लाडू व अन्य पदार्थ ठेवले होते.
दरम्यान या महोत्सवाला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी भेट दिली. तसेच प्रत्येक स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली.
या वेळी त्यांनी राऊत दांपत्यांनी लावलेला स्टॉलला भेट देवून मोहफुलाच्या लाडूची चव चाखून त्या तृप्त झाल्या.
तसेच राऊत दांपत्यांचे कौतुक केले. झाडीपट्टीच्या नावाने विदर्भ प्रसिध्द आहे.
या महोत्सवात राऊत दांपत्यांनी मोहफुलाची राब, लाडू,जवस, लाखोळी डाळ, तुवरडाळ, चना डाळ, उळद डाळ, जैविक तांदूळ, काळा तांदूळ, लाल तांदूळ, मसूर, राणातील भाजीपाला, कुळ्याचे फुल, शेंगा, बाहव्याचे फुले, तरोटा आदी प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

Web Title: Sonia Gandhi tweeted the taste of Mohla lava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.