रुजू होताच ठाणेदारांचे अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:15+5:302021-08-29T04:28:15+5:30

पदभार हाती घेताच ठाणेदार जाधव यांनी अवैध धंद्याला लगाम लावण्याचा प्रयत्न केल्याने सध्या एक प्रकारचा दरारा निर्माण झाल्याचे दिसते. ...

As soon as it was introduced, Thanedar's campaign against illegal trades | रुजू होताच ठाणेदारांचे अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र

रुजू होताच ठाणेदारांचे अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र

Next

पदभार हाती घेताच ठाणेदार जाधव यांनी अवैध धंद्याला लगाम लावण्याचा प्रयत्न केल्याने सध्या एक प्रकारचा दरारा निर्माण झाल्याचे दिसते. कार्यरत पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांची बदली जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली. त्यांच्या जागी गोंदिया नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. ठाणेदार पदाची सूत्रे हाती घेताच अवैध धंद्यावर आळा बसावा म्हणून त्यांनी धाडसत्र सुरू केले. अर्जुनी मोरगाव येथील कमलेश भाऊराव लेदे (२४) यांच्या विरोधात जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. महागाव येथील विनोद बकाराम बोरकर (४१), बाक्टी येथील राहुल मेश्राम (५३), कुंभीटोला येथील प्रेमचंद राऊत (३४) यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ठाणेदारांच्या धाडसत्र मोहिमेने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: As soon as it was introduced, Thanedar's campaign against illegal trades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.