ढोल व शहनाईचा आवाज समाजाला प्रेरित करतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:38 PM2019-02-23T23:38:53+5:302019-02-23T23:39:24+5:30
आदिवासी नगारची समाज गरीबीमुळे विकासापासून कोसोदूर आहे. आदिवासी नगारची समाजाचे ढोल व शहनाई हे पारंपारिक वाद्य आहेत. सण-उत्सवात ढोल-शहनाईचा आवाज संपूर्ण समाजाला प्रेरित करीत असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी नगारची समाज गरीबीमुळे विकासापासून कोसोदूर आहे. आदिवासी नगारची समाजाचे ढोल व शहनाई हे पारंपारिक वाद्य आहेत. सण-उत्सवात ढोल-शहनाईचा आवाज संपूर्ण समाजाला प्रेरित करीत असतो. अनेक सण-उत्सवांमधून या वाद्यांचा वापर केला जातो. सद्या डीजेच्या युगातही या ढोल-शहनाईलाच्या वाद्याला समाजात मान्यता आहे. हे वाद्य टिकविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य लखनसिंह कटरे यांनी केले.
अखिल भारतीय आदिवासी नगारची समाज विकास समितीतर्फे गोंदियाच्या नारायण लॉन येथे आदिवासी नगारची संस्कृती महासंमेलन बुधवार (दि.२०) आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक जि. प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवप्रसाद बरले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष रूकेश नागरची, रोशन सावंतवान, विनय नागरेराजेंद्र मरस्कोल्हे, मधुकर उईके, राजकुमार हिवारे,विजय राठीपीटाने, भूवन बुरले, रूकेश नगारची, रोशन पडवार, विनय नागरे, राजू मिरचुले, कुंजीलाल कुमरे, बसंत सिंहमारे, सुधाकर नगारची, वनवास हिवारे, घनश्याम नगारची, विजय राठीपीटने, रामभरोश अकलगुनिया उपस्थित होते. महाराष्टÑ, छत्तीसगड व मध्यप्रदेश या तीन राज्यातील समाजबांधव या मेळाव्याच्या निमीत्ताने एकत्र आले होते. या संमेलनात आदिवासी नगारची समाजाची संस्कृती समाजातील तरूणांच्या नृत्यातून दाखविण्यात आली. नगारची समाजाचे ढोल, शहनाई हे वाद्य वाजवण्यात आले. पुराडा व चिखली येथील तरूण-तरूणींनी आदिवासी वेषभूषेत नृत्य सादर केले.उदघाटक जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी आदिवासी समाजाचे पारंपारीक वाद्य नागरा वाजवून संमेलनाचे उद्घाटन केले.या वेळी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी व राष्ट्रीय बिरसा ब्रिगेडचे संघटक सतीश पेंदाम यांनीही मार्गदशन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी केले. त्यांनी आदिवासी नगराची समाजातीच दशा, दिशा यावर माहिती दिली. संचालन राजेश सोरले तर आभार संजीव कुंमरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मधुकर उईके, विजय राठीपीटने, दिनेश तांडे, भूपेंद्र बुरले, वनवास हिवारे, राजू मिरचुले, कुंजीलाल कुंमरे, बसंत सिंहमारे, सुधाकर नगारची, घनश्याम नागरची, रामभरोष अकलगुनिया, रोशन सावतवान, मिथून राठी यांनी सहकार्य केले.
या समाजबांधवांचा सत्कार
या वेळी नगारची समाजातील जेष्ठ समाजसेवकांचा समाजभूषण म्हणून सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. स्व.उमेदलाल सोरले, राठीपीठणे, योगेश सोरले, श्रीराम येरके, श्रीराम बेरले, पेंढारी हिवारे, सिंहमारे, गोरेलाल नागरे, अर्जुनीसिंग नागरे, बॅरिस्टर नगारची यांचा सत्कार करण्यात आला.