तलाठ्याच्या माध्यमातून पीक पेरा भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:29 AM2021-09-03T04:29:23+5:302021-09-03T04:29:23+5:30
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने ई- पीक पाहणी ॲप करून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकाची नोंदणी सदर ॲपद्वारे करावी, असे ...
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने ई- पीक पाहणी ॲप करून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकाची नोंदणी सदर ॲपद्वारे करावी, असे आवाहन शासनाने केले आहे; परंतु ई-पीक नोंदणी करण्यात ग्रामीण क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी कंटाळले आहेत. याकरिता तलाठ्याकडून पीक पाहणी करावी, अशी मागणी कपिल राणे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बोनस आणि रब्बीच्या चुकाऱ्याची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोषाची भावना निर्माण झालेली आहे. कमीत कमी ७५ टक्के शेतकऱ्यांकडे मोबाइल नाही, मग ई-पीक पाहणी कशी करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची नोंदणी करतानासुद्धा अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पिकाची माहिती भरताना पिकांची माहिती कशी भरावी, हे अनेक शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे कायम पडीक क्षेत्राची नोंदणी, बांधावरची झाडांची नोंदणी करतानासुद्धा अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ई-पीक पाहणी सामान्य शेतकऱ्यांना भरणे शक्य नाही. त्यांच्याकडे अण्ड्रॉइड मोबाइल असला तरी पण अनेक ठिकाणी ॲपमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तलाठ्याच्या माध्यमातून पीक पेरा भरण्याची मागणी केली जात आहे.