बीज प्रक्रिया करूनच बियाणांची लागवड करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:08+5:302021-06-09T04:37:08+5:30

आमगाव तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेतकरी खरीपाचे व नर्सरीचे नियोजन करत आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ...

Sow seeds only after seed processing () | बीज प्रक्रिया करूनच बियाणांची लागवड करा ()

बीज प्रक्रिया करूनच बियाणांची लागवड करा ()

Next

आमगाव तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेतकरी खरीपाचे व नर्सरीचे नियोजन करत आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विविध गावांत बीज प्रक्रिया व बीज उगवण प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात आले आहे. बियाणे नर्सरीसाठी वापरताना बीज प्रक्रिया करून वापरावे धान बियाणाला ३ टक्के मीठाच्या द्रावणाची प्रक्रिया करून दोनदा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. त्यानंतर ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजनिर्मिती रोगांसाठी थायरम या बुरशी नाशकाची प्रक्रिया करावी व नर्सरी टाकण्याच्या २ तासपूर्वी ॲझ्याटोबॅस्टर व त्यानंतर पीएसबी व केएमबी याची प्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी जाणून घ्यावा रासायनिक खत बचतीच्या उपाययोजना आमगाव तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत रासायनिक खत वापरामध्ये १० टक्के बचतबाबत मोहीम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत जमीन आरोग्य सुपीकता निर्देशांक फलक देण्यात आलेले आहेत तसेच ग्रामसभेत व मासिक सभेत या फलकांचे वाचन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ॲझोला या हिरवळीच्या खताचा वापर केल्याने खतांची मात्रा २५ टक्के कमी लागते. त्यामुळे प्रत्येक गावात ॲझोला टाकी तयार करून वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले तसेच भातशेतीत सरळ रासायनिक खत न टाकता युरिया ब्रिकेटचा वापर करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. युरिया ब्रिकेट तालुका बीजगुणन केंद्र आमगाव येथे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध आहे.

Web Title: Sow seeds only after seed processing ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.