१ लाख ९१ हजार हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 09:33 PM2019-06-18T21:33:04+5:302019-06-18T21:34:22+5:30

मृग नक्षत्र यंदा पूर्णपणे कोरडा गेला असून अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टर मधील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जून महिना संपत येत असताना सुध्दा वरुण राजाने दर्शन न दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून असल्याचे चित्र आहे.

Sowing of 1 lakh 91 thousand hectares avoided | १ लाख ९१ हजार हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

१ लाख ९१ हजार हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

Next
ठळक मुद्देपाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातूर : दमदार पावसाची प्रतीक्षा, उत्पादनात घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मृग नक्षत्र यंदा पूर्णपणे कोरडा गेला असून अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टर मधील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जून महिना संपत येत असताना सुध्दा वरुण राजाने दर्शन न दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून असल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात १ लाख ९१ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने खते, बियाणांचे नियोजन केले आहे. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी मृगाचा दमदार पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरूवात करतात. लवकर पेरणी केल्यास पऱ्हे लवकर येऊन लवकर रोवणी करण्यास मदत होते. त्याचा उत्पादन वाढीवर सुध्दा परिणाम होत असतो. त्यामुळे मृगाचा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी करण्यासाठी लगबग सुरू असते. मात्र यंदा मृग नक्षत्र पूर्ण कोरडा गेला असून मान्सून अद्यापही सक्रीय झालेला नाही. त्यामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. तर काही शेतकरी धूळ पेरणी करून जोखीम पत्थकारण्याच्या तयारीत आहेत. मात्र धूळ पेरणीसाठी सुध्दा जमिनीत थोडाफार ओलावा व ढेकले फुटण्याची गरज आहे. मात्र अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने ढेकले फुटले नसून धूळ पेरणी केल्यास ती सुध्दा वाया जाण्याची शक्यता आहे. तर कृषी विभागाने दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करु नये असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आठ दहा दिवस पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी पाणी करून थोड्याफार प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. मात्र असे शेतकरी केवळ मोजकेच आहे.जून महिन्यातील पुन्हा दहा दिवस शिल्लक असून या कालावधीत पाऊस न झाल्यास पेरण्या लांबून त्याचा उत्पादनावर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते यामुळे आठ ते दहा टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
मशागतीची कामे पूर्ण
शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राला सुरूवात होण्यापूर्वीच शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करुन ठेवली आहे. तर दमदार पाऊस होताच पेरणीला सुरूवात करता यावी यासाठी खते, बियाणे खरेदी करुन ठेवले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे लागल्या आहेत.
कृषी केंद्रांवर शुकशुकाट
जून महिना संपत येत असला तरी वरुन राजाने अद्यापही दर्शन दिले नाही. त्यामुळे पेरणीच्या कामाला अद्यापही वेग आलेला नाही. परिणामी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी दिसून येत नसून शुकशुकाट असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.
मजुरांना रोजगाराची प्रतीक्षा
खरीप हंगामाला सुरूवात झाल्यानंतर पेरणीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांच्या हाताला काम मिळत असते. मात्र यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. तर लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे मनरेगाची कामे सुध्दा यावर्षी उन्हाळ्यात उपलब्ध झाली नाही. त्यामुळे कामाच्या शोधात मजुरांना इतरत्र भटकंती करावी लागली.

शेतकºयांनी पेरणीसाठी घाई करु नये, जोपर्यंत दमदार पाऊस होवून जमिनीत चार ते पाच इंचापर्यंत ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये. हवामान खात्याने येत्या आठ दहा दिवसात पावसाचा अंदाज वर्तविला असून शेतकºयांनी पेरणीसाठी प्रतीक्षा करावी.
- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

Web Title: Sowing of 1 lakh 91 thousand hectares avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस