प्रदूषणामुळे चिमण्यांना धोका

By Admin | Published: May 27, 2017 12:53 AM2017-05-27T00:53:24+5:302017-05-27T00:53:24+5:30

धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकांच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.

Sparrows are at risk of pollution due to pollution | प्रदूषणामुळे चिमण्यांना धोका

प्रदूषणामुळे चिमण्यांना धोका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धुळीपासून चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकांच्या प्रदूषणामुळे पशुपक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे. पूर्वी पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सतत चालणारा चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाला. शहरातील सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचे निवारेसुध्दा लोप पावले. परंतु चिमण्यापाखरांसोबत नातीगोती जपणाऱ्यांनी मात्र चिमण्यांचा सहवास मिळावा म्हणून पक्षीप्रेमी नागरिक घरांच्या गच्चीवर कृत्रिम घरटे लावण्याचा उपक्रम राबवतात.
पशुपक्षी घरट्यातून बाहेर येत एकच कलरव होत होता. तेव्हा पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे महिला मंडळी पहाटे सडा सारवण करीत होत्या. परंतु आता सूर्यवशींचा जमाना आला. कुणालाही सडा सारवण करण्याची गरज वाटत नाही. जुन्या काळची भूपाळीसुध्दा काळाच्या पडद्याआड गेली आहे.
विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती करून मानवाला ऐहिक सुखाच्या विळख्यात टाकले आहे. परंतु तेवढेच दुष्परिणामसुध्दा वाढले आहेत. मानवी जीवन आजाराने वेढले गेले. विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर ठरत आहे. यामुळे मानवाला अनेक आजारांनी ग्रासले आहे. निसर्गातील पशुपक्षीसुध्दा काळाच्या पडद्याआड जात आहे.
जंगलात पिकावर होत असलेल्या अतिविषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे खाद्य अळ्यासुध्दा नाहिशा झाल्याने पशुपक्ष्यावर उपासमारी येऊ लागली आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या चिमण्या तर केवळ बोटावर मोजण्याइतक्या दिसून येतात. "कावळ्यांचे घर शेणाचे आणि चिमणीचे घर मेणाचे" ही म्हणसुध्दा कालबाह्य झाली आहे.
शहरी भागात सिमेंट रस्ते आणि मोठमोठ्या इमारतीमुळे शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट नाहिसा झाला. पहाट कधी होते हे कळायला मार्ग नाही. कालांतराने येणाऱ्या पिढीला केवळ पुस्तकात चिमण्यांचे चित्र पाहून समाधान मानावे लागेल. पर्यावरणवाद्यांनी यावर चिंतन करण्याची वेळ आली तर शासनाने याकरिता विशेष कायदा करणे गरजेचे झाले. भ्रमणध्वनीसुध्दा याला कारणीभूत ठरत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.
शहरातून तर चिमण्यांचा चिवचिवाट कायमचा बंद झाल्याने निसर्गवाद्यांना सतत चिंता भेडसावू लागली आहे. पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी घराच्या आजूबाजूला कृत्रिम घरटे आणि पाण्याची व्यवस्था करून चिमण्या पाखरांना निवारा देण्याचा प्रयत्न करीत असतात.

 

Web Title: Sparrows are at risk of pollution due to pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.