जगाच्या बाजारात स्थान मिळविण्यासाठी बोलते व्हा

By admin | Published: June 28, 2017 01:32 AM2017-06-28T01:32:52+5:302017-06-28T01:32:52+5:30

वाणीवर प्रभुत्व मिळवून जगाचे अनभिषीक्त सम्राट बनले आहेत हे सर्वश्रृत आहे. माझा राज्यव्यापी नव्हे तर देशभर दौरा आपणाला ....

Speak to get place in the world market | जगाच्या बाजारात स्थान मिळविण्यासाठी बोलते व्हा

जगाच्या बाजारात स्थान मिळविण्यासाठी बोलते व्हा

Next

पुरूषोत्तम खेडेकर : अर्जुनीत जनसंवाद सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : वाणीवर प्रभुत्व मिळवून जगाचे अनभिषीक्त सम्राट बनले आहेत हे सर्वश्रृत आहे. माझा राज्यव्यापी नव्हे तर देशभर दौरा आपणाला बोलते करण्यासाठी आपणांशी संवाद साधण्यासाठी आहे. म्हणून आपण मुकसंमती दर्शवू नका आपण बोलते व्हा, समाजात संवाद साधा, आता बहुजणांनी शिक्षीत होवून इतिहासातील सत्यता समोर मांडणे गरजेचे आहे. कुणबी मराठा सेवा संघात सर्व बहुजणांना स्थान असून सर्व ३३ कक्षाची पूर्णता बांधणी करावी भारतात महासत्ताक राष्ट्र बनविण्यासाठी आता बहुजणांनी पुढाकार घ्यावा असे परखड विचार कुणबी मराठा सेवा संघाचे संस्थापकीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.
येथील यश अध्यापक महाविद्यालयात रविवारी (दि.२५) आयोजीत जनसंवाद सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे इंजि. देवानंद कापसे, प्रा. दिलीप चौधरी, उद्योजक तिवाडे, प्राचार्य भाऊराव राऊत हे होते.
पुढे बोलताना खेडेकर यांनी, संवादाअभावी समाजव्यवस्था मोडकळीस चालली असून कुटूंब व्यवस्थेवर सुध्दा याचा फटका बसला आहे. समाजव्यवस्थेची घडी व्यवस्थीत करण्यासाठी मराठा सेवा संघाचे कार्य पून्हा जोमात सुरु करण्यासाठी आपण येथे आलो असून बहुजन समाजातील सर्व घटकांनी यासाठी एकमेकात सलोखा निर्माण करावा. आपण पुन्हा लवकरच आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत असल्याचे सांगितले. प्रा. चौधरी, देवानंद कापसे, भाऊराव राऊत यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन झाली. पाहुण्यांचे स्वागत बालकांनी राष्ट्रसंताच्या गीतांनी करण्यात आली.
संजीवनी खोटेले यांच्या वक्तृत्वांनी तसेच जान्हवी शिवणकर यांच्या नृत्य व चित्रपटात काम केल्याबद्दल खेडेकरांनी त्यांना कौतुकाची धाप देऊन मराठा सेवा संघाच्या कक्षामार्फत विशेष प्रशिक्षण देणार असल्याचे सांगीतले.
प्रास्ताविक अनिल शिवणकर यांनी मांडले. संचालन कृष्णकांत खोटेले यांनी केले. आभार उध्दव मेहेंदळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अनिरुध्द ढोरे, राधेशाम भेंडारकर, भोजराज रहेले, जितेंद्र खोटेले, हितेश खोटेले, अजय मेश्राम, प्रा. मानसे, प्रा. भगवंत फुलकटवार, होमदास ब्राम्हणकर, दिलीप फुंडे, डॉ. दिपक रहेले, मनोज खुरपुडे, राजू शिवणकर, मनोहर शहारे, संजय कुतरमारे, संपत कठाणे, निशांत शहारे, योगीराज शिवणकर, कुदेन जिजीत्कार, अभय मेहेंदळे, राकेश भर्रे, प्रा. सतपुरुष शहारे, पद्मजा मेहेंदळे, सुनीता हुमे, शोभा गंथडे, ममता मैंद, डॉ. देवानंद शहारे इतर उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Speak to get place in the world market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.