पूर्व गोंदियासाठी विशेष विद्युत लाईन

By admin | Published: April 13, 2016 02:02 AM2016-04-13T02:02:59+5:302016-04-13T02:02:59+5:30

उन्हाच्या तिव्रतेसोबतच विजेचा लपंडावही वाढत चालला आहे. ऐन उन्हाळ््यात विजेच्या या खेळीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

Special electric line for East Gondiya | पूर्व गोंदियासाठी विशेष विद्युत लाईन

पूर्व गोंदियासाठी विशेष विद्युत लाईन

Next

१५ दिवस चालेल काम : भर उन्हाळ्यात सिव्हील लाईनमध्ये विजेचा लपंडाव
कपिल केकत गोंदिया
उन्हाच्या तिव्रतेसोबतच विजेचा लपंडावही वाढत चालला आहे. ऐन उन्हाळ््यात विजेच्या या खेळीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. यातच शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात आजघडीला जास्त प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू आहे. पूर्व गोंदियाकडील भागासाठी वीज कंपनीकडून विशेष लाईन टाकली जात असून हे काम पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच एप्रिल अखेरपर्यंत नागरिकांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागणार आहे.
वर्षभरात इतर ऋतूत वीज पुरवठा खंडीत झाल्यास तेवढा त्रास होत नाही. मात्र उन्हाळ््यात वीज गेली तर अगोदर वीज वितरण कंपनीच्या नावाने लोक बोटे मोडू लागतात. उन्हाळ््यात विजेची मागणी व वापर वाढत असल्यानेही याच दिवसांत जास्त प्रमाणात बिघाड येतात. वितरण व्यवस्थेत आलेल्या बिघाडाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.
आजघडीला जिल्हा भारनियमनमुक्त असला तरी वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू च आहेत. त्यामुळे हे कोणते भारनियमन? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. यातही शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात हे प्रकार जास्त प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्व गोंदियातील काका चौक, गोविंदपूर, छोटा गोंदिया, जनता कॉलनी, शास्त्री वॉर्ड, पंचायत समिती कॉलनी आदि भागांना सध्या रावणवाडी व गोरेगाव लाईनवरून वीज पुरवठा केला जात आहे. अशात या दोन लाईनवर कुठेही
ेकाही नादुरूस्ती झाल्यास शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. या भागात वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अनेक प्रतिष्ठितांची घरे आहेत.
विशेष म्हणजे, या भागासाठी विशेष लाईन टाकण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण झाल्यास वीजेच्या या समस्येपासून या भागाची सुटका होणार आहे. उर्वरीत शहराला दोन विशेष लाईनवरून पुरवठा केला जात असल्याने उर्वरीत शहरात वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या कमी आहे.

एप्रिल महिना मेंटेनन्सचा
वीज वितरण कंपनीत एप्रिल महिना हा देखभाल-दुरूस्तीचा (मेंटनन्सचा) असतो. याला ‘प्री मान्सून मेंटनन्स’ म्हटले जाते. या काळात वीज विभागाकडून झाड कापणे, रोहीत्राची देखभाल-दुरूस्ती, लघूदाब व उच्चदाव लाईन देखभाल-दुरूस्ती केली जाते. त्यानुसार आताही जिल्ह्यात ही सर्व कामे सुरू आहेत. कधी ही कामे वीज पुरवठा सुरू असताना करावी लागतात. कधी ही कामे वीज पुरवठा बंद करून करावी लागतात. विशेष म्हणजे दुरूस्तीच्या कामांत थोडीही चूक झाल्यास त्याची शिक्षा जीवावरच बेतते. त्यामुळे वीज पुरवठा बंद करूनच ही कामे करणे जास्त सुरक्षित असते. या शिवाय वीजेचा दाब वाढल्यानेही वितरण व्यवस्थेत नादुरूस्ती येत असून त्यामुळेही वीज पुरवठा खंडीत होत असतो.

असा होतो वीज पुरवठा
जवळील एमआयडीसी येथे १३२ केव्ही उपकेंद्रातून चार वाहिन्या निघाल्या आहेत. यात एक कारंजा मार्गे गोरेगावसाठी, दुसरी रावणवाडीसाठी तर उर्वरीत दोन वाहिन्यांतून सुर्याटोला उपकेंद्राच्या माध्यमातून शहराला वीज पुरवठा केला जातो. यात सिव्हील लाईन्स परिसरातील गोविंदपूर, छोटा गोंदिया, जनता कॉलनी, शास्त्री वॉर्ड, पंचायत समिती कॉलनी आदि भागांसाठी विशेष व्यवस्था नसल्याने सध्या या भागासाठी एमआयडीसीवरून विशेष लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाईन एमआयडीसीवरून निघणार असून कुडवा नाका, बालाघाट रोड टी-पॉईंट, हड्डीटोली रेल्वे चौकी मार्गे भीमघाट उपकेंद्राला जोडली जाणार आहे. या लाईनचे काम येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर सिव्हील लाईन्स परिसरात या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची समस्या संपणार आहे. मात्र तोपर्यंत या परिसराला गोरेगाव व रावणवाडी फिडरवरून पुरवठा केला जात आहे.

Web Title: Special electric line for East Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.