खरीप हंगामासाठी खत बचतीची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:48+5:302021-05-21T04:29:48+5:30

या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, तूर इत्यादीकरीता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करुन देणे, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ...

Special fertilizer saving campaign for kharif season | खरीप हंगामासाठी खत बचतीची विशेष मोहीम

खरीप हंगामासाठी खत बचतीची विशेष मोहीम

Next

या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, तूर इत्यादीकरीता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करुन देणे, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर जमीन सुपिकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे व त्याचे सामूहिक वाचन करणे, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करणे, जैविक खतांची बीज प्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाण्यांचे अनुदानावर वितरण करणे, भात पिकाकरिता युरिया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषी सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रीय कर्बाची वाढ होण्यासाठी उसाची पाचट जागेवर कुजविणे, गांडुळ खत व कंपोस्ट खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांची मागणी कमी करणे आणि विविध पीक योजनेंतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

Web Title: Special fertilizer saving campaign for kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.