सातबाराविषयी तलाठ्यांची १५ मार्चला विशेष ग्रामसभा
By admin | Published: March 3, 2017 01:31 AM2017-03-03T01:31:58+5:302017-03-03T01:31:58+5:30
महसूल खात्यातील गावपातळीवरील नागरिकांची महत्वाची कामे, त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी
गोंदिया : महसूल खात्यातील गावपातळीवरील नागरिकांची महत्वाची कामे, त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी येत्या १५ मार्च रोजी प्रत्येक तलाठी साज्याच्या मुख्यालयी संध्याकाळी ६ वाजतानंतर ग्रामसभा घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर मुले व मुली यांची नावे वारसा हक्काने सात-बारावर नोंदविणे, वडील व मुले यांच्यामध्ये किंवा भावा-भावामध्ये शेतजमिनीची वाटणी करु न खाते फोड करणे, वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करणे, जमीन जर सिंचनाखाली असेल आणि त्याची नोंद सात-बारावर झालेली नसेल अशा नोंदी अद्यावत करु न घेणे, ज्या मुलींचे वारसाची नोंदी सात-बारावर नसेल त्याची नोंद करु न घेणे याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एकाच वेळी निपटारा करण्याचे जिल्हाधिकारी काळे यांनी ठरविले. ज्या तलाठयांना अतिरिक्त साज्यांचा कार्यभार आहे त्या साझा मुख्यालयी संबंधित तलाठ्याकडून दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ मार्च रोजी ग्रामसभा घेण्यात येईल व गरज पडल्यास १७ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)