गर्भवती मातांसाठी गावोगावी विशेष सभा

By admin | Published: February 16, 2017 12:38 AM2017-02-16T00:38:29+5:302017-02-16T00:38:29+5:30

डॉ.एपीजे अब्दूल कलाम सकस आहार योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व गर्भवती मातांच्या कुटुंबातील पुरुषांना

Special meeting for the pregnant mothers | गर्भवती मातांसाठी गावोगावी विशेष सभा

गर्भवती मातांसाठी गावोगावी विशेष सभा

Next

पती व सासऱ्यांची उपस्थिती : सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा पुढाकार
गोंदिया : डॉ.एपीजे अब्दूल कलाम सकस आहार योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व गर्भवती मातांच्या कुटुंबातील पुरुषांना म्हणजेच पती व सासरे यांना गर्भवती मातेच्या आरोग्याबाबत जागरु क करण्यात येत आहे. त्यासाठी महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी (दि.२४) गावोगावी विशेष सभांचे आयोजन केले जाणार आहे.
जिल्ह्यातील गर्भवती मातांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुन्य मृत्यू अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत गर्भवती स्त्रीयांच्या आहाराकडे काही ठराविक गावांमध्ये डॉ.एपीजे अब्दूल कलाम सकस आहार योजना राबवून गर्भवती मातांना योग्य तो आहार दिला जात आहे. इतर गावांमध्ये गर्भवती माता घेत असलेल्या आहारावर आंगणवाडी सेविका, अधिपरिचारीका यांच्यामार्फत नियंत्रण ठेवले जात आहे. त्यांच्या नियमीत आरोग्याच्या तपासणीचा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत व शहरी भागात जिल्हा शल्य चिकित्सकामार्फत तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे यांच्या तर शहरी भागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.
मातेचे दरमहा हिमोग्लोबीन व रक्त तपासणी करून त्याची माहिती त्या कुटुंबातील सदस्यांना देण्याची योजना आहे. या महिन्यातील पुरु ष सदस्यांची सभा दि.२४ ला घेण्यात येणार आहे. या सभेचे स्थळ आणि वेळ प्रत्येक गावनिहाय ठरविण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी करणार आहे. गोंदिया व तिरोडा नगरपालिका यासह जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमध्ये गर्भवती महिलांच्या कुटुंबातील पुरु ष सदस्यांच्या सभा घेण्याचे नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली बाई गंगाबाई शासकीय स्त्री रु ग्णालय, तिरोडा उपजिल्हा रु ग्णालय आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक करणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय कार्यकर्त्यांचाही यात सहभाग राहणार आहे. त्यांनी गावातील किंवा वॉर्डातील गर्भवती महिलांच्या घरातील पुरु ष सदस्य सभेला राहतील यासाठी प्रयत्न करावे व गर्भवती महिलांच्या आरोग्याविषयी चर्चा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Special meeting for the pregnant mothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.