रेल्वे स्थानकांवर ‘विशेष स्वच्छता अभियान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 08:41 PM2018-05-30T20:41:41+5:302018-05-30T20:42:29+5:30
भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या संपूर्ण साफसफाईसाठी रेल्वे बोर्डाद्वारे एका महिन्याचा ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २४ मे ते २५ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या संपूर्ण साफसफाईसाठी रेल्वे बोर्डाद्वारे एका महिन्याचा ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २४ मे ते २५ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.
या विशेष स्वच्छता अभियानाद्वारे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या तिन्ही मंडळांच्या सर्व स्थानके, स्थानक परिसर, प्लॅटफार्म व स्थानकात असलेल्या सर्व कार्यालयांची संपूर्ण स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच रेल्वेगाड्यांमध्येही विशेष स्वच्छता अभियान राबवून साफसफाई केली जात आहे.
या अभियानात गाड्यांमधील साफसफाईकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच गाड्यांच्या आत काही वेळेच्या अंतरात गाड्यांना निष्पादन केले जात आहे. विशेष म्हणजे अशा क्षेत्रात सामान्यत: स्वच्छतेची निरंतर गरज असते. त्या ठिकाणी साफसफाई करून प्रवाशांकडून फीडबॅकसुद्धा घेतले जात आहे.
सोबतच स्वच्छता अभियानाद्वारे जनजागृतीसाठी पोस्टर, बॅनर, नुक्कड नाटक, डिसप्लेद्वारे रेल्वे प्रवाशांमध्ये जागृती आणली जात आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने संपूर्ण प्लॅटफार्ममध्ये स्वच्छतेबाबत नजर ठेवली जात आहे. त्यामुळे स्थानक परिसरात कोणत्याही ठिकाणी सफाई बाकी राहणार नाही. साफसफाई करून सर्व कचरा नष्ट केला जात आहे.
स्थानक व गाड्यांची साफसफाई करण्यासोबतच स्वच्छतेचा लाभ व त्याची आवश्यकता याबाबत जागृती घडवून आणली जात आहे. जर एखादा प्रवासी हेतूपरस्पर कचरा पसरविताना आढळला तर त्याला कर्मचाऱ्यांद्वारे समुपदेशनही केले जात आहे व नंतर दंडसुद्धा आकारले जात आहे.
स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांद्वारे निरीक्षणही केले जात आहे. स्वच्छतेचा आढावा घेवून येणाऱ्या समस्यांना दूर केले जात आहे. स्वच्छतेत उणिव राहू नये यासाठी सफाई कर्मचारी, पर्यवेक्षकांसह संपर्क बनविण्यात येत आहे. गाड्यांमध्येही निरीक्षक केले जात आहे. तसेच स्वच्छतेबाबत अहवाल तयार करून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येत आहे.
२४ मे ते २५ जूनर्यंत एका महिन्याच्या स्वच्छता अभियानात रेल्वेचे सर्व स्थानके, स्थानकातील कार्यालये व प्लॅटफार्म, ट्रॅकवर स्वच्छतेबाबत केवळ प्रवाशांमध्येच जागृती घडवून आणली जात नाही तर स्टॉफसुद्धा साफसफाईबाबत जागृत राहून आपापल्या कार्यालयात स्वच्छतेबाबत संपूर्ण लक्ष ठेवत आहेत. तसेच गरज भासल्यास संबंधित कार्यालयाच्या मदतीने स्वच्छता पूर्ण केले जात आहे. या अभियानाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ज्ञानेश्वरी व समरसता एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये संशोधन
रेल्वेद्वारे एक्स्प्रेस गाड्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवून प्रवाशांसाठी वेळोवेळी अतिरिक्त डब्यांची (कोच) व्यवस्था व कोच प्रकारांमध्ये संशोधन केले जाते. त्याचप्रकारे गाडी (१२१०१/१२१०२) कुर्ला-हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस व गाडी (१२१५१/१२१५२) कुर्ला-हावडा-कुर्ला समरसता एक्स्प्रेस गाड्यांच्या कोचमध्ये संशोधन केले जात आहे. गाडी (१२१०१/१२१०२) कुर्ला-हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या एसी-२ चे दोन कोच, एसी-३ चे सहा कोच, एसी-१ चा एक डब्बा, स्लीपर सात कोच, सामान्य तीन डब्बे, पेंट्रीकार एक कोच, दोन जनरेटरसह एकूण २२ कोचमध्ये संशोधन केले जात आहे. कुर्ला येथून ८ आॅक्टोबर २०१८ पासून तर हावडा येथून ५ आॅक्टोबर २०१८ पासून संशोधन केले जाणार आहे. तसेच गाडी (१२१५१/१२१५२) कुर्ला-हावडा-कुर्ला समरसता एक्स्प्रेसमध्ये एसी-२ चे दोन कोच, एसी-३ चे सहा कोच, एसी-१ चा एक डब्बा, स्लीपरचे सात डब्बेड, सामान्य तीन कोच, पेंट्रीकार एक कोच, दोन जनरेटरसह एकूण २२ डब्ब्यांमध्ये संशोधन होणार आहे. कुर्ला येथून १ आॅक्टोबर २०१८ पासून व हावडा येथून ३ आॅक्टोबर २०१८ पासून हे संशोधन होणार आहे.