कुंभमेळ्यासाठी गोंदिया, इतवारी येथून विशेष रेल्वे गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:42 IST2025-02-17T16:41:14+5:302025-02-17T16:42:00+5:30

भाविकांची होणार सुविधा : चार दिवस सोडणार गाड्या

Special trains from Gondia, Itwari for Kumbh Mela | कुंभमेळ्यासाठी गोंदिया, इतवारी येथून विशेष रेल्वे गाड्या

Special trains from Gondia, Itwari for Kumbh Mela

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
प्रयागराज महाकुंभमेळात जाण्यासाठी भाविकांचा वाढलेला ओढा बघता भाविकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया आणि इतवारी जंक्शनवरून काही ठराविक दिवशी विशेष गाडी कुंभमेळाकरिता चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने १८, २०, २१ व २३ फेब्रुवारी या चार दिवशी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात गाडी क्र. ०८८६७गोंदिया-तुंडला कुंभमेळा विशेष ट्रेन १८ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला सुद्धा ०८८६८ तुंडला-गोंदिया कुंभमेळा विशेष ट्रेन तुंडला येथून १९ फेब्रुवारी रोजी चालविण्यात येत आहे.


द.पू.मध्य रेल्वेकडून धावणाऱ्या कुंभमेळा विशेष ट्रेनला डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भाटपारा, उसलापूर, पेंड्रारोड, अनुपपूर, शहडोल, उमरिया, न्यू कटनी जंक्शन, कटनी, मैय्यर, सतना जंक्शन, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, फतेहविंदपूर, टी. जंक्शन, टी. सदर ही गाडी गोंदियाहून सकाळी ८:२० वाजता सुटेल आणि डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता टुंडला येथे पोहोचेल. तीच गाडी टुंडला येथून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि इटावा, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, माणिकपूर मार्गे १५:२० वाजता गोंदियाला पोहोचेल.


त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०८८६३ इतवारी-तुंडला ही २० फेब्रुवारीला आणि ट्रेन क्रमांक तुंडला-इतवारी २१ फेब्रुवारीला चालेल. या गाडीचा थांबा भंडारा रोड, तुमसर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, मदनमहल, कटनी, मैहर, सतना जंक्शन, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी, इटावा रेल्वे स्थानकांवर असेल. तर, २३ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून गाडी क्रमांक ०८८६८ गोंदिया-तुंडला कुंभमेळा विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला सुद्धा ०८८७० तुंडला गोंदिया कुंभमेळा विशेष गाडी तुंडला येथून २४ फेब्रुवारी रोजी चालविण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे. प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून चार विशेष गाड्यांमुळे आता भाविकांना सुविधा होणार आहे.


प्रवाशांची गर्दी लक्षात घेता निर्णय
महाकुंभमेळ्या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. वाढती गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने चार दिवस विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Special trains from Gondia, Itwari for Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.