सट्टा बाजाराला आले उधाण

By admin | Published: January 7, 2017 01:57 AM2017-01-07T01:57:52+5:302017-01-07T01:57:52+5:30

नगर परिषदेची निवडणूक आता अंतीम टप्यात आली असतानाच नगराध्यक्षपदासह प्रभागात असलेल्या दिग्गजांच्या हातजीतवर

The speculation came in the market | सट्टा बाजाराला आले उधाण

सट्टा बाजाराला आले उधाण

Next


उमेदवारांच्या हारजीतवर लागली पैज : तासागणिक बदलतात रेट

गोंदिया : नगर परिषदेची निवडणूक आता अंतीम टप्यात आली असतानाच नगराध्यक्षपदासह प्रभागात असलेल्या दिग्गजांच्या हातजीतवर आता पैज लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरात आता सट्टाबाजाराला उधाण आले आहे. यामुळे सट्टाबाजारातील उमेदवारांचे रेट बघून निवडणुकीतील चुरस अधिकच वाढू लागली आहे.

नगर परिषदेसाठी ४२ सदस्य व नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक येत्या ८ तारखेला होत आहे. या निवडणुकीला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहीला असून सर्वांच्या नजरा आता निवडणुकीक डेच लागलेल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त निवडणुकांच्याच चर्चा शहरातील कानाकोपऱ्यात रंगल्या आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार यालाच घेऊन सर्वच आपापली गणिते लावत आहेत. त्यात तासातासात नवनवे समिकरण व काल्पनीक निकाल पुढे येत आहेत.

रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना घेऊन सर्वांचेच आपापले मत असल्याने कोण पुढे राहील व कोण बाजी मारेल हे त्यांचे तेच ठरवीत आहेत. अशात मात्र सध्या सर्वाधीक चर्चेचा विषय ठरत आहे तो शहरातील प्रथम नागरिकाच्या निवडीचा. शहरातील हा दुसरा प्रयोग असून यापूर्वीही नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक झाली आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शहरवासीयांची उत्सुकता वाढली आहे. नेमके याच रणधुमाळीवरून आता निवडणुकीच्या अंतिम टप्यात सट्टाबाजाराला उधाण आले आहे.

सट्ट्याची जाण असणारे तसेच काहींकडून फक्त शौक म्हणून आता रिंगणातील उमेदवारांवर रेट लावले जात आहेत. यात प्रामुख्याने नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या व त्यातही फाईट मध्ये असलेल्या काही निवडक उमेदवारांच्या नावावर हा सट्टाबाजार जोर धरत आहे. यामध्ये दर तासागणीक रेट बदलत चालले असून यातूनच किती जणांचे यात इंटरेस्ट आहे याची कल्पना करता येते. तर प्रभागातूनही रिंगणात असलेल्या काही दिग्गजांच्या नावावरही सट्टा लावला जात असल्याची माहिती आहे. यात आता कुणाच्या हाती लक्ष्मी लागते तर कुणाचे खिसे खाली होतात हे तर निकालावरच अवलंबून आहे.



प्रचाराला शनिवारच्या रात्रीची मुदत

येत्या रविवारी होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचाराला अधिकच जोर आला आहे. ात प्रचार वाहनांच गर्दी असतानाच शेवटचा फेर म्हणून उमेदवारही आपापल्या समर्थकांसह मतदारांच्या दारी पोहचत आहेत. अशात निवडणुकीच्या प्रचाराला शनिवारच्या रात्री १० वाजतापर्यंतची मुदत असल्याने उरलेल्या कालावधीत प्रचार सभा व अन्य मार्गांनी प्रचार केले जात आहेत. त्यानंतर मात्र शुकशुकाट होणार आहे.

Web Title: The speculation came in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.