विकासाला गती केवळ काँग्रेसमुळेच शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:27 AM2018-05-26T00:27:29+5:302018-05-26T00:27:29+5:30

सत्तेवर नसताना धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्या अशी मागणी करणारे भाजप सरकार केंद्र व राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता त्यांना तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यापासून कोण रोखत आहे.

Speed ​​of development is possible only by Congress | विकासाला गती केवळ काँग्रेसमुळेच शक्य

विकासाला गती केवळ काँग्रेसमुळेच शक्य

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तुमखेडा येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सत्तेवर नसताना धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्या अशी मागणी करणारे भाजप सरकार केंद्र व राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता त्यांना तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यापासून कोण रोखत आहे. हे सरकार जसे दिसते तसे प्रत्यक्षात नसून या सरकारने केवळ शेतकरी व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचेच काम केले. विकासाच्या नावावर मोठ्या गप्पा मारणाऱ्या सरकारने ठोस असे एकतरी काम सांगावे. विकासाला गती केवळ काँग्रेस सरकारच्या काळातच मिळू शकते, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा. रिपाई चे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुन्नीलाल बेंद्रे, उपसभापती धनलाल ठाकरे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमनलाल बिसेन, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, चिंतामन चौधरी, वाय.पी.रहांगडाले, दिनेश गौतम उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले, मागील चार वर्षात भाजप सरकारने धानाच्या हमीभावात एक रुपयाने सुध्दा वाढ केली नाही. बोनसची घोषणा केली मात्र अद्यापही ते धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होवून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. दुष्काळग्रस शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने महागाई आकाशाला भिडली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली. मात्र सत्तेवर येताच या सरकारला सर्वच आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच वेळ आहे.
या पोटनिवडणुकीत कुकडे यांच्या पाठीशी उभे राहुन सत्तारुढ सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले. कटरे म्हणाले भाजप निवडणुकीला जातीवादाचा रंग देत आहे.
मात्र मागील चार वर्षात सरकारने शेतकरी, बेरोजगार व सर्वसामान्यांसाठी काहीच केले नाही त्यामुळेच जनताच या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल असे सांगितले.

Web Title: Speed ​​of development is possible only by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.