भरधाव टिप्परची मोटारसायकलला धडक. दोन महिला ठार 

By अंकुश गुंडावार | Published: September 28, 2023 06:37 PM2023-09-28T18:37:49+5:302023-09-28T18:37:59+5:30

याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

speeding tipper collided with a motorcycle two women were dies | भरधाव टिप्परची मोटारसायकलला धडक. दोन महिला ठार 

भरधाव टिप्परची मोटारसायकलला धडक. दोन महिला ठार 

googlenewsNext

अंकुश गुंडावार, गोंदिया: गोंदिया-आमगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरठाजवळील कालव्याजवळी आमगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टिप्परने मोटारसायकलस्वारास दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज(दि.२८)दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार टिप्पर क्रमांक एमएच ३५ एजे १०२१ ने मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एम ७५६५ ला धडक दिली. यात सत्यशिला ब्रिजलाल बिसेन(३६) व सुनीता सूरजलाल बिसेन (२३) रा.पोकरटोला(टेकरी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ठाणा येथे आपल्या मुलीच्या येथील घरगुती कार्यक्रम आटोपून या दोन्ही महिला दिपक ब्रिजलाल बिसेनसोबत मोटारसायकलने गावाकडे जात असतांना ही घटना घडली. मोटारसायकलचालक दिपक बिसेन हा गंभीर जखमी असल्याने त्याला आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: speeding tipper collided with a motorcycle two women were dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात