भरधाव ट्रकची पोलिसांच्या वाहनाला धडक; एक ठार

By नरेश रहिले | Published: July 3, 2024 08:36 PM2024-07-03T20:36:45+5:302024-07-03T20:37:27+5:30

मासुकसा घाटावरील घटना: पोलीस उपनिरीक्षक व चालक पोलिस बालबाल बचावले

speeding truck collides with police vehicle one died | भरधाव ट्रकची पोलिसांच्या वाहनाला धडक; एक ठार

भरधाव ट्रकची पोलिसांच्या वाहनाला धडक; एक ठार

नरेश रहिले, गोंदिया: देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासुलकसा घाटावर भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रकने राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या वाहनाला जब्बर धडक दिल्याने एक पोलीस कर्मचारी ठार झाल्याची घटना ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.मनीष बहेलीया (३२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासुलकसा घाटावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्यासाठी जात होते. महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगाव केंद्र कॅम्प डुग्गीपारचे महामार्ग पोलिस पोलीस उपनिरीक्षक दिनेश लिल्हारे, वाहन चालवितांना योगेश बनोटे व मागे बसलेला मनीष बहेलीया (३२) घाटावर पोहचले.

यावेळी पाईप घेऊन जाणार ट्रॅक क्रमांक सीजी०८ एके १४०२ ने भरधाव वेगात चालवून त्याने महामार्ग वाहतूक पोलिसांच्या गाडी क्रमांक एमएच १२ आर टी ९६२५ ला जोरदार धडक दिली. या कारमध्ये बसलेले पोलिस कर्मचारी मनीष बहेलीया (३२) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात आणताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेसंदर्भात देवरी पोलिस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया करीत आहेत.

चार वाहनांना धडक; चालक होता मद्याच्या धुंदीत

मध्याच्या धुंदीत ट्रकचालक रायपूर कडून नागपूरकडे लोखंडी पाईप घेऊन जात होता. ट्रक चालकाने मद्याच्या धुंदीत चार वाहनांना धडक दिली. पोलीस वाहनाला धडक दिल्याने एक पोलिस ठार झाला. पोलीस वाहनानंतर एका ट्रॅव्हल्स धडक दिली. ट्रॅव्हल्सच्या काचा फुटल्या. त्यानंतर स्कार्पीओ वाहनाला धडक दिली. शेवटी एका ट्रकला त्या ट्रने धडक दिली. या धडकेत चारही वाहनांचे नुकसान झाले. देवरी पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: speeding truck collides with police vehicle one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात